शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे ‘रामभरोसे’च

By admin | Updated: November 11, 2014 23:19 IST

सुरक्षेची हमी नाही : ‘लोकमत’ने दिले होते सात दिवसांपूर्वीच संकेत

रजनीकांत कदम - कु डाळ -वारंवार पटरी सोडून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या सतत अपघात होण्याच्या कारणांबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने वेळीच सतर्क व्हावे, असे सावधानतेचे आणि जागृकतेचे वृत्त अवघ्या सात दिवसांपूर्वी येऊनही कोकण रेल्वे प्रशासन अजूनही प्रवाशांच्या सुरक्षेच्यासंदर्भात गंभीर नसल्याचे निदर्शनास येत आहे. या कारभारामुळे कोकणकन्या एक्स्प्रेस नुकतीच एका मोठ्या अपघातापासून वाचली. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा सध्यातरी ‘रामभरोसे’ असून मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशांमधून केला जात आहे. १ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेने सर्व गाड्यांचा वेग वाढविला आहे. गेल्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या मार्गावरील पाच रेल्वे अपघात पटरीवरून ट्रेन घसरल्यामुळे झाले. यापैकी चार मालगाड्या होत्या. तर एक सावंतवाडी-दिवा पॅसेंजर होती. या पाच अपघातात सुमारे १८ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. तर अनेक प्रवाशांना रेल्वे खोळंबल्याने त्रास सहन करावा लागला. तसेच रेल्वे पटऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. प्रशासनामध्ये गांभीर्य नाहीकोकण रेल्वे मार्गावरून रेल्वे का घसरतात, याबाबत कोकण रेल्वे प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. ३ नोव्हेंबर रोजी रेल्वे सुरक्षेसंदर्भात उपाययोजना न केल्यास प्रवास धोक्याचा होण्याच्या इशाऱ्याचे वृत्त ‘लोकमत’ मधून प्रसिद्ध झाले होते. मात्र, याला सात दिवस होत नाहीत, तोपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील लाजूळ आणि करबुडे बोगदा दरम्यान रेल्वेच्या रुळाला चार इंच तडा गेल्याचे निदर्शनास आले. दैव बलवत्तर म्हणून ट्रॅकमॅन सचिन पाडावे यांच्या सकाळी साडेसातच्या सुमारास ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी काही वेळातच तिथून जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसला त्या ठिकाणाहून अवघ्या ३०० मीटर अंतरावर थांबवून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. सुदैवाने हा अपघात टळला असला, तरी कोकण रेल्वे प्रशासनाने अजूनही प्रवाशांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार केला नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जनतेला रेल्वे मंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षायोगायोगाने कोकण भूमीचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू सध्या देशाचे रेल्वेमंत्री झाले आहेत. त्या अगोदरचे रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांनी रेल्वेचे स्वप्न साकार केले. आता कोकण रेल्वेच्या सुरक्षेकरिता व प्रवाशांच्या निर्धोक, सुखकर प्रवासाकरिता रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडून कोकणवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. निदान आता तरी कोकण रेल्वेला चांगले दिवस येतील अशी आशा कोकणातील जनता बाळगून आहे. प्रत्यक्षात त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे.अपघाताची भीतीगेल्या काही महिन्यात कोकण रेल्वेला पाच अपघात झाले. तर हा सहावा अपघात सुदैवाने टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तरी रेल्वे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रवाशांच्या मनात अपघाताबाबत भीती निर्माण झाली आहे.अनेक आव्हाने पेलून, दरीडोंगर, नद्यानाले ओलांडून, भुयार पार करून आलेल्या कोकण रेल्वेला आतापर्यंत निसर्गाने साथ दिलेली आहे.परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहेत. जेणेकरून प्रवाशांच्या मनातील भीती दूर होईल.