शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल

By admin | Updated: August 24, 2014 22:35 IST

प्रवाशांना अपघाताची माहिती न दिल्याने संताप

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वीर ते करंजाडी स्थानकादरम्यान मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे ७ डबे रुळावरून घसरले. आज (रविवार) सकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल या स्थानकांवर अनेक रेल्वेगाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. घसरलेले डबे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, मार्ग मोकळा करण्यासाठी शेकडो कामगार कार्यरत आहेत. या अपघातामुळे मार्गावरील आज धावणाऱ्या १४ रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या सात एक्सप्रेस गाड्या अन्य मार्गे वळविण्यात आल्या. ऐन गणेशोत्सव काळातील या अपघातामुळे खळबळ माजली असून, मार्ग तातडीने मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कोकण रेल्वे व्यवस्थापनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रायगड विभागात पॅसेंजर ट्रेनचा मोठा अपघात झाला होता. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही कोकण रेल्वेने मार्ग योग्य राखण्याबाबत दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. या अपघातामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकात संपर्कक्रांती, मंगलासह तीन गाड्या सकाळी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांतील प्रवाशांना गाड्या का थांबविल्या हे सकाळी १० वाजेपर्यंत सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या या वागणुकीबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. १२६१९-मत्स्यगंधा एक्स्प्रेसेच्या वेळेत बदल करण्यात आला असून ही रेल्वे२४ रोजी दुपारी ३.२० वाजताऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून २५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे. म्हणजेच ही रेल्वे ९ तास २० मिनिटांनी उशिराने सुटणार आहे. (प्रतिनिधी)प्रवाशांना अपघाताची माहिती न दिल्याने संतापरत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी सकाळी साडेसहा वाजता उक्षीच्या पुढील भोके स्थानकावर उभी करून ठेवण्यात आली. प्रथम प्रवाशांना काहीही कारण सांगितले जात नव्हते. नंतर ही गाडी मुंबईला जाण्याऐवजी पुन्हा रत्नागिरी स्थानकाकडे आणून रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. वेळीच माहिती न देण्याच्या रेल्वेच्या वृत्तीचा अनेकांनी निषेध केला.