शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड-चिपळूण मार्गाचा बागुलबुवा

By admin | Updated: March 3, 2015 00:35 IST

मोहन केळुसकर यांचा सुरेश प्रभूंवर आरोप

कणकवली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात कऱ्हाड-चिपळूण या नवीन मार्गासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वास्तविक या मार्गावर कोयना धरण असून या धरणाच्या पाण्यापासून वीजनिर्मिती करणारे संयंत्रे जमिनीखाली १०० मीटर खोदाई करून बसविली आहेत. त्यामुळे भौगोलिक आणि व्यवहारीदृष्ट्या कऱ्हाड-चिपळूण हा रेल्वे मार्ग म्हणजे प्रभंूचा बागलबुवा आहे. जागतिक स्तरावर जलवाहतूक स्वस्त असल्याने बंदरांना कमालीचे महत्त्व आले आहे. या परिस्थितीत प्रभूंनी केवळ पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला खूृश करण्यापेक्षा कोल्हापूर-रत्नागिरी किंवा कणकवलीला जोडणाऱ्या मार्गाची घोषणा केली असती तर हे मार्ग पुढे बंदरांना जोडता आले असते. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांची ही घोषणा केवळ बागलबुवा आहे, अशी टीका कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी शनिवारी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.या प्रसिद्धीपत्रकात केळुसकर म्हणाले, कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाची मागणी ही केवळ राज्याच्या अथवा कोकणच्या भल्यासाठी नाही. या मार्गामुळे देशाचा उत्तर-दक्षिण भाग जवळच्या मार्गावरून जोडला गेला आहे. संरक्षणाच्यादृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे जलद वाहतुकीच्यादृष्टीने या मार्गाचे दुपदरीकरण तातडीने होणे हे देशाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. प्रभूंच्या स्वप्नातील ५० हजार रोजगार निर्मितीची क्षमता दुपदरीकरणामुळे फलद्रुप होईल. कऱ्हाड-चिपळूण मार्ग झाला तर त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, बागायतदार, साखर कारखाने, उद्योगांना होणार आहे. त्याऐवजी कोल्हापूर-रत्नागिरी अथवा कणकवलीला जोडणारा मार्ग हवा. त्यातही विजयदुर्ग बंदर होऊ घातले आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पही मार्गी लागणार आहे. त्यामुळे कोल्हापूर ते विजयदुर्ग हा बंदर जोडणारा मार्ग संयुक्त ठरेल. त्यामुळे कोकणासह राज्यातील सर्व पक्षांच्या खासदारांनी या रेल्वेच्या दुपदरीकरणासह बंदराला जोडणारा मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी लॉबी निर्माण करायला हवी. (प्रतिनिधी)