शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

राजन रेडकर यांना केली धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:18 PM

रेडी येथून वेंगुर्ला येथे कामानिमित्त जात असलेले भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागीय सीईओ राजन रेडकर यांना अज्ञात दुचाकीस्वारांनी धक्काबुक्की केली व मायनिंगबाबत तक्रारी करण्याचे थांबव, नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याबाबतची तक्रार रेडकर यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली.

ठळक मुद्देराजन रेडकर यांना केली धक्काबुक्कीवेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार

वेंगुर्ला : रेडी येथून वेंगुर्ला येथे कामानिमित्त जात असलेले भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागीय सीईओ राजन रेडकर यांना अज्ञात दुचाकीस्वारांनी धक्काबुक्की केली व मायनिंगबाबत तक्रारी करण्याचे थांबव, नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याबाबतची तक्रार रेडकर यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली.रेडकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी सायंकाळी रेडी येथून दुचाकीने मी सागरेश्वर-वेंगुर्ला येथे जात होतो. माझ्यासोबत असलेले सौरभ नागोळकर गाडी चालवित होते. आमच्यामागोमाग रेडी ते वेंगुर्ला जाणाऱ्या रस्त्याने दोन दुचाकीस्वार आम्हांला ओव्हरटेक करून मोचेमाड घाटी येथे पुढे आले. त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने माझ्या नावाने हाक दिली. म्हणून मी सौरभ याला गाडी थांबविण्यास सांगितले.त्याचवेळी दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती माझ्याकडे चालत आली. मायनिंगच्या संदर्भात तक्रार करतो ते थांबव. नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी देऊन त्याने झटापट केली. यात माझा शर्ट फाटून नुकसान झाले. मी त्याला पकडणार एवढ्यात ते दोघे आपल्या काळ््या रंगाच्या दुचाकीवरून पळून गेले, असे म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग