शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जामडूल अंगणवाडीची दुरवस्था

By admin | Updated: July 23, 2015 00:01 IST

मागणी करूनही दुर्लक्ष : मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आचरा : डोक्यावर धोकादायक छप्पर...जीव टांगणीला... अशीच काहीशी स्थिती आचराबाग-जामडूल येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांची आहे. शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या या मुलांच्या सुरक्षेकडे महिला बालकल्याण विभागाचे तीन वर्षे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे. एकीकडे एकाच दिवसात २०६ कोटींच्या खरेदीनंतर चर्चेत असणारे राज्याचे महिला बालकल्याण खाते मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मालवण तालुक्यातील आचराबाग-जामडूल येथे प्राथमिक शाळेला लागून अंगणवाडीची इमारत आहे. येथे १३ मुले शिक्षणाचे धडे गिरवतात. या अंगणवाडीचे छप्पर पूर्णत: मोडकळीस आले आहे. सन २०१२ पासून येथील अंगणवाडी सेविका करिष्मा हिर्लेकर यांनी आचरा ग्रामपंचायत, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी, मालवण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. (वार्ताहर)पुरेसा निधी नाहीआचरा सरपंच मंगेश टेमकर यांनी पुरेसा निधी ग्रामपंचायतीकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेने लक्ष द्यावे, अशी सूचना मांडली आहे. तर मुलांच्या सुरक्षेचा विचार करता प्राथमिक शाळेत मुलांना बसण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे. तरी याबाबत लक्ष घालून इमारत दुरुस्तीस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.