शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 16:59 IST

आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...? असे फलक जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांच्या दालनाबाहेर लावण्यात आले आहेत. हे फलक कामानिमित्त जिल्हाभरातून येणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाचे ते फलक वेधताहेत नागरिकांचे लक्ष : के. मंजुलक्ष्मी यांची संकल्पनाआम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...?

सिंधुदुर्गनगरी : आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...? असे फलक जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांच्या दालनाबाहेर लावण्यात आले आहेत. हे फलक कामानिमित्त जिल्हाभरातून येणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची आहे.हागणदारीमुक्त अभियानात आशिया खंडात प्रथम बाजी मारणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छ जिल्हा स्पर्धेत पठारी भागात देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेत अग्रेसर असणाºया जिल्हा परिषदेने आता प्लास्टिकमुक्त जिल्हा यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे.२ आॅक्टोबर या दिवशी केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून पूर्ण देशात प्लास्टिक पिकअप डे हा उपक्रम राबविला. हा उपक्रमसुद्धा सिंधुदुर्ग प्रशासनाने उत्तम नियोजन करून जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत क्षेत्रे व जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे याठिकाणी राबविला. ११ टनांपेक्षा जास्त प्लास्टिक या मोहिमेतून गोळा करण्यात आले. त्याची विल्हेवाट २७ आॅक्टोबरपर्यंत लावण्याचे नियोजन गटविकास अधिकारी स्तरावर करण्यात आले आहे.जिल्हा प्रशासनाने प्लास्टिक मुक्तीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याची सुरुवात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी प्लास्टिक वापर बंदीचा संदेश देण्यासाठी वेगळी युक्ती लढवित सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे यांच्या दालनाबाहेर फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...? असे लिहिण्यात आले आहे.यातून आम्ही प्लास्टिक वापरत नाही. तुम्हीही प्लास्टिकचा वापर करू नका, असा संदेश द्यायचा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून हा प्लास्टिक बंदीचा नवा फंडा सुरू करण्यात आला आहे. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीsindhudurgसिंधुदुर्ग