शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

धामापुरात रोखली अवैध वाळू वाहतूक

By admin | Updated: February 2, 2015 00:02 IST

ग्रामस्थ आक्रमक : धुळीच्या त्रासाला कंटाळून कृती; रात्रीचासुद्धा खडा पहारा

चौके : मालवण तालुक्यातील धामापूर बौद्धवाडीतील महिला व ग्रामस्थांनी भरधावपणे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे रस्त्यावरील धुळीचा त्रास झाल्यामुळे तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या प्राथमिक शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून डंपर चालकांविरोधात आक्रमक होत या मार्गावरील डंपर वाहतूक रोखली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, धामापूर येथे वाळू उत्खनन सुरु असून त्याची वाहतूक करण्यासाठी या मार्गावरून डंपरची वाहतूक सुरु असते. त्यात करून सध्या वाळू व्यवसाय अनधिकृतपणे सुरु असल्याने बहुतांशी रात्रीची वाहतूक सुरु असते. परंतु धामापुरातील हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे ज्यावेळी या रस्त्यावरून एखादा डंपर भरवेगात जातो त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व घरांमध्ये तसेच सार्वजनिक विहीर, समाजमंदिर आणि प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. असे ७० ते ८० डंपर दिवसाला या मार्गावरून वाळू वाहतूक करतात, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे घरात राहणे मुश्किल झाले आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज शाळा धुवून काढावी लागते. त्यानंतर शाळेतील वर्ग बसण्यायोग्य होतात.परंतु धामापुरातील काही स्थानिक तरुण या व्यवसायातून रोजगार मिळवितात. म्हणून दररोज रस्त्यावर पाणी मारून डंपर वाहतूक करण्यास बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी परवानगी दिली होती. परंतु तसे होत नसल्यामुळे ग्रामस्थांना धुळीचा त्रास सहन करावा लागला. शेवटी आक्रमक होऊन वाडीतील महिलांनी हे पाऊल उचलले असे यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले.वाळू वाहतूक करणारे डंपर हे नेहमी भरधाव वेगात असतात. त्यामुळे या मार्गावरून पायी चालणाऱ्या तसेच दुचाकीस्वारांना नेहमी जीव मुठीत धरूनच चालावे लागते. तसेच बौद्धवाडीतील लोक ज्या सार्वजनिक विहिरीचे पाणी पितात ती विहीर रस्त्याच्या कडेला असून डंपर वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे विहिरीचे पाणीही दूषित होत असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. बहुतांश वेळा रात्रीची डंपरमधून वाळू वाहतूक होत असल्याने परिसरातील घरांमधील लहान मुले डंपरच्या आवाजामुळे दचकून जागी होतात. त्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा धोकाही महिलांनी बोलून दाखविला.म्हणूनच गेले दोन दिवस आणि रात्रीसुद्धा या मार्गावरील डंपर वाहतूक महिलांनी अडविली. यावेळी वाडीतील महिला सुवर्णा नाईक, संपदा धामापूरकर, विनया जाधव, नीलम नाईक, दीपिका जाधव, सिताबाई जाधव, जयश्री जाधव, अशोक थवी, सत्यवान थवी, उल्हास थवी, जगन्नाथ नाईक, आनंद नाईक, रोहिणी नाईक, रामचंद्र जाधव तसेच इतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)