शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना इंटरनेट सुविधा देणार

By admin | Updated: November 12, 2014 23:58 IST

गुरूनाथ पेडणेकर : शिक्षक समितीला आश्वासन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील १४४ केंद्रशाळांमध्ये इंटरनेट सुविधा पुरवली तर वेतनप्रणाली, शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म आॅनलाईन भरणे, समाजकल्याण शिष्यवृत्ती फॉर्म आॅनलाईन भरणे तसेच इतर शैक्षणिक माहिती आॅनलाईन भरणे सोयीस्कर होईल. ही बाब नूतन शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या भेटीत त्यांच्याशी चर्चा करताना शिक्षक समितीच्यावतीने मांडण्यात आली. चर्चेअंती १४४ शाळांना इंटरनेट सुविधा देण्याचे सभापती यांनी आश्वासन संघटनेस दिले.प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच नूतन शिक्षण सभापती, वित्त व बांधकाम सभापती, यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ७ नोव्हेंबर २०१२ व २९ डिसेंबर २०१२च्या आदेशाने शिक्षकांचे वेतन प्रदान करण्यासाठी शालार्थ वेतन प्रणालीप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. सर्व शाळांना जिल्हा परिषदेमध्ये इंटरनेट सुविधा पुरविण्याबाबत शासनाने कळविले. परंतु शाळांची संख्या जास्त असल्याने सर्व शाळांना एकाचवेळी ही सुविधा जिल्हा परिषद पुरवू शकत नाही. याबाबत लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर, प्रभारी सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, शिक्षक नेते भाई चव्हाण, राज्य महिला प्रतिनिधी सुरेखा कदम, सचिव प्रमोद गावडे, उपाध्यक्ष लवू दहिफळे, कणकवली सचिव संतोष कुडाळकर, कुडाळ सचिव सचिन मदने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शिक्षकांच्या समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांशी शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान माजी वित्त बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदाशिव ओगले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)