शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन नगरपंचायत भाजपकडे, एक सेना राष्ट्रवादीकडे, एक त्रिशंकू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:40 PM

नीतेश राणे दोन पैकी एका नगरपंचायतीवर विजय तर एकीकडे पराभव, वैभव नाईक यांना ही स्पष्ट बहुमत नाही, तर केसरकरांचा दोडामार्ग मध्ये दारूण पराभव झाला आहे.

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चार नगरपंचायतपैकी वैभववाडी व दोडामार्गमध्ये भाजपचा एकतर्फी विजय. देवगडमध्ये महाविकास आघाडी तर कुडाळमध्ये त्रिशंकू परिस्थिती. जिल्ह्यातील तिन्ही विद्यमान आमदारांना जनतेने धक्कादायक निकाल दिला आहे. नीतेश राणे दोन पैकी एका नगरपंचायतीवर विजय तर एकीकडे पराभव, वैभव नाईक यांना ही स्पष्ट बहुमत नाही, तर केसरकरांचा दोडामार्ग मध्ये दारूण पराभव झाला आहे.जिल्ह्यातील देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत भाजपला नाकारून जनतेन सेना राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला. १७ पैकी भाजप ८,  शिवसेना ८ आणि राष्ट्रवादी १ जागा मिळाली. त्यामुळे भाजपचा येथे निसटता पराभव झाला आहे. आमदार नीतेश राणेंसाठी तो धक्का मानला जात आहे. दुसरीकडे वैभववाडी नगरपंचायत मध्ये नीतेश राणेंनी बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. १७ पैकी ९ जागा मिळवून सत्ता काबीज केली आहे. दोन अपक्ष निवडणून आले आहेत. ते मुळचे भाजपचे आहेत. वैभववाडीत भाजप ९, शिवसेना ५ आणि अपक्ष ३ निवडून आले आहेत.कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला असला तरी सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या हे काँग्रेस ठरविणार आहे. याठिकाणी भाजपला ८, सेनेला ७ आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक रिंगणात होता. तर सेना आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यामुळे याठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे. आता कोणाच्या हातात सत्ता द्यायची हे भाजप ठरविणार आहे. आमदार वैभव नाईक राज्यात सत्ता असतानाही नगरपंचायत निवडून आणू शकलेले नाही. आता त्यांना काँग्रेसचा आधार घ्यावा लागणार आहे.दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीला धोबीपछाड देत १७ पैकी तब्बल १३ जागा जिंकून आमदार दीपक केसरकर यांना मोठा धक्का दिला आहे. येथे सेनेला २, राष्ट्रवादी १ व अपक्ष १ असे पक्षिय बलाबल राहिले आहे.एकंदरीत भाजपने जिल्हा बँक निवडणूक पाठोपाठ चारपैकी दोन नगरपंचायत जिंकून आघाडी घेतली आहे. तर अन्य दोन ठिकाणी भाजपला चांगले यश मिळाले आहे. आता प्रत्यक्षात नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजप चारही ठिकाणी नगराध्यक्ष बसविण्यासाठी प्रयत्न करेल यात काही शंका नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Dipak Kesarkarदीपक केसरकरVaibhav Naikवैभव नाईक