शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग अभियंत्यांना धरले धारेवर

By admin | Updated: July 28, 2015 21:36 IST

रास्ता रोकोचा इशारा : सटमटवाडीतील दरडीची जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे कोसळलेली दरड अद्यापही जैसे थे असून सोमवारी दुपारी दरड कोसळलेल्या ठिकाणाची जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ही दरड ताबडतोब न हटविल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सहाय्यक अभियंता योगिता वळवी यांना धारेवर धरण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद विषय समितीचे सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, सरपंच मंदार कल्याणकर, अन्वर खान, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, पंचायत समिती सदस्य स्वप्निल नाईक, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई आदी उपस्थित होते. मंदार कल्याणकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात येथील दरड हटवावी, यासाठी ग्रामपंचायतीने सातत्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याशी पत्रव्यवहार केला. मात्र, वेळोवेळी याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच पावसाळयात दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रीय महामार्ग खाते आहे.यावेळी दरड कोसळलेल्या ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने रस्ताच्या दुतर्फा वाहनचालकांना समजण्यासाठी ताबडतोब फलक लावण्याची मागणी केली. तसेच दरड कोसळलेल्या भागात रस्त्यावर पाणी साचत असल्याने या पाण्याचा निचराही तत्काळ करावा, तसेच कोसळलेली माती तातडीने हटवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या वर्षभरात दरडीमुळे पाचजणांना जीव गमवावा लागला असून येत्या आठ दिवसांत दरड न हटविल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी योगिता वळवी यांना दिला. (प्रतिनिधी) आश्वासनयावेळी सहाय्यक अभियंता योगिता वळवी यांनी दरड हटविण्याचे आश्वासन दिले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण एकमेव अधिकारी असून खात्याकडे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच हे काम रखडल्याचे वळवी यांनी कबूल केले. महामार्गावर दुतर्फा फलक लावण्यात येणार असून काही दिवसांतच येथील दरड पूर्णपणे हटविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.