शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री कंपनीचे की आरोंदावासीयांचे?

By admin | Updated: January 14, 2015 00:34 IST

संदेश सावंत : तेलींचीही चौकशी करा

सावंतवाडी : पालकमंत्री दीपक केसरकर हे आमच्याच दालनात आले, आमचा सत्कार स्वीकारला आणि सायंकाळी आम्हालाच अटक करण्यास सांगितली. त्यामुळे केसरकर हे नेमके आरोंदावासीयांच्या बाजूने आहेत की जेटीच्या बाजूने, असा सवाल जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केला. जिल्हा परिषदेत पूर्वी भ्रष्टाचार असेल, तर त्यात तेलीही सामील होते का, याचीही चौकशी करा, अशी मागणीही सावंत यांनी यावेळी केली.जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत हे सावंतवाडीत आले असता त्यांनी येथील पंचायत समिती सभापतीच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, सभापती प्रमोद सावंत, शहराध्यक्ष मंदार नार्वेकर आदी उपस्थित होते.यावेळी संदेश सावंत म्हणाले, ज्या दिवशी आरोंदा प्रकरण घडले, त्यावेळी मी स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून स्थायी समितीसोबत आलो होतो. मला अटक होणार हे माहीत नव्हते. अन्यथा मी लाल दिव्याची गाडी आणली नसती, असे सांगत पोलिसांच्या कारवाईनंतर मी गाडी घेऊन आलो नाही, असा खुलासाही यावेळी सावंत यांनी केला.आम्ही स्थायी समिती म्हणून जेटी कंपनीने अडविलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो. या रस्त्यावर पूर्वी जिल्हा परिषदेचा निधी खर्ची पडला असून, आता तो रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आमचा तो अधिकार असून आमचा दौरा पूर्वनियोजितच होता, असे सावंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या दौऱ्यात अधिकारी आले नाही, यावरून राजकारण करणे योग्य नाही, असा खुलासा त्यांनी केला.जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे राजन तेली यांनी तक्रार करावीच. कारण तेही पूर्वी आमच्यातच होते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे कदाचित तेही भ्रष्टाचारात सामील असतील, असा टोला सावंत यांनी तेली यांना लगावला. (प्रतिनिधी)भिंत पाडणारच; लक्ष प्रशासनाच्या कारवाईकडेराज्यमार्ग अडवून जेटी कंपनीने घातलेली भिंत पाडण्याचा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी इशारा दिला होता. अधिकाऱ्यांनी ही भिंत अनधिकृत असून आम्हीच पाडतो, असे राणे यांना सांगितल्याने आम्ही थांबलो आहोत. भिंत त्यांनी नाही पाडली, तर आम्हाला पाडावीच लागेल, असा इशाराही सावंत यांनी दिला.