शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांची स्वच्छता

By admin | Updated: November 11, 2014 23:22 IST

देवगड तालुक्यातील स्थिती : स्वच्छ भारत अभियान

पुरळ : स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने देवगड तालुक्यामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून यामुळे शासकीय कार्यालये स्वच्छ झाली आहेत.देवगड तहसीलदार कार्यालय, देवगड पोलीस ठाणे, विजयदुर्ग पोलीस ठाणे, तालुक्यातील ग्रामपंचायती, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पशुदवाखाने, मंडळ अधिकारी कार्यालये, अंगणवाड्या या ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाने कार्यालयांमध्ये साफसफाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छतेचा नारा हातात घेतला आहे. संपूर्ण देशामध्ये शासकीय कार्यालयांमध्ये सार्वजनिक ठिकाणी समाजसेवक, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. देवगड पोलीस ठाण्यामध्ये निरीक्षक अरविंद बोडके व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण पोलीस ठाणे व परिसराची स्वच्छता केली. तालुक्यातील संपूर्ण प्राथमिक शाळांमध्ये दिवाळीची सुट्टी संपल्यावर शाळा सुरू होताच शाळेचा परिसर स्वच्छ भारत अभियानाचे आदेश पालन करून स्वच्छ करण्यात आला. यामुळे शिक्षकांच्या हातात पहिल्यांदाच झाडू पाहिल्याचे दिसून येत होते. विद्यार्थीही यात सहभागी झाले होते.तसेच तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींमध्ये ६ मंडल निरीक्षक कार्यालये, आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र, पशु दवाखान्यांमध्ये साफसफाई करून स्वच्छता मोहीमेचे पालन केल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयामध्ये टेबल-खुर्च्या, कपाटे स्वच्छ करण्यात आली. संगणकामधील अनावश्यक माहिती काढून टाकण्यात आली. भिंतीवरील अनावश्यक पत्रव्यवहार काढून टाकण्यात आले. जुन्या दप्तरांचे वर्गीकरण करताच हे दप्तर नवीन कापडांमध्ये बांधण्यात आले. ग्रामपंचायतींच्या शौचालयांचीही साफसफाई करण्यात आली. शाळांमधील अनावश्यक साहित्यांचे निर्लेखन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जुने खराब झालेले शैक्षणिक साहित्य जाळण्यात आले व नवीन साहित्याची निर्मिती करण्यावर भर देण्यात आला. तर काही शाळांनी स्वच्छतेच्या प्रबोधनासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभातफेरी काढली. अंगणवाडीमध्येही जुन्या साहित्याचे निर्लेखन करण्यात आले. यामुळे तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आल्यामुळे कार्यालये स्वच्छ झाली आहेत. विजयदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी स्वत: हातात झाडू घेऊन पोलीस स्टेशन व परिसर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने स्वच्छ केला.स्वच्छ भारत अभियान देशभर राबवले जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये या योजनेची योग्य अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच देवगड पवनचक्कीजवळ विजयदुर्ग किल्ल्यावर व त्या- त्या गावातील तिठ्यांवर प्लास्टिकच्या व दारुच्या रिकाम्या बाटल्या प्रचंड प्रमाणात असल्याचे दिसून येते. याची स्वच्छता न केल्यास पर्यटनाला खीळ बसू शकते. (वार्ताहर)नदी, ओहोळ परिसर स्वच्छ झाला पाहिजेदेवगड तालुक्यामध्ये नदी व ओहोळांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यामध्ये पालापाचोळा साचून दुर्गंधी निर्माण झाली आहे. तेथे स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता केली तर खरोखरच स्वच्छता अभियान सफल होऊन भारत स्वच्छ होऊ शकतो. स्वच्छता अभियान हे एखाद्या वार्षिकासारखे असता कामा नये. ते दरवर्षी राबविले गेले पाहिजे. तरच देश खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत होईल.