शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

रानटी हत्तींपासून संरक्षण मिळावे

By admin | Updated: November 22, 2014 00:11 IST

वेताळबांबार्डेवासीयांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सिंधुदुर्गनगरी : वेताळबांबार्डे परिसरात रानटी हत्तीच्या वावरामुळे तेथील ग्रामस्थ आणि शाळेतील मुले भयभीत झाली आहेत. वस्तीत येऊन हत्तींनी आतापर्यंत अनेकांना जखमी केल्याने हत्तीपासून वेताळबांबार्डेवासीयांना संरक्षण मिळावे, अशी मागणी वेताळबांबार्डे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.वेताळबांबार्डे गावात रानटी हत्तींचा वावर वाढला आहे. भातशेती, माड बागायती नष्ट करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. सतत हत्तींचा वावर या परिसरात असल्याने ग्रामस्थांना व शाळेतील मुलांना घराबाहेर पडणेही मुश्कील बनले आहे. आतापर्यंत गावातील अनेकांना हत्तीच्या हल्ल्यात सामोरे जावे लागले आहे. हत्तीच्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. १९ नोव्हेंबर रोजी हत्तीच्या हल्ल्यात वेताळबांबार्डे गावातील ग्रामस्थ गायकवाड हे जबर जखमी झाले आहेत. सध्या ते गोवा बांबुळी येथे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. येत्या आठ दिवसात यावर योग्य निर्णय न घेतल्यास २९ नोव्हेंबरपासून सर्व ग्रामस्थ शाळेतील मुलांना घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबार्डे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय गावसभेत घेतला आहे. शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य भारती चव्हाण, पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, सरपंच रोहिणी चव्हाण, उपसरपंच संतोष कदम, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत चव्हाण, माजी सरपंच हरिश्चंद्र कदम, वासू गावडे, शैलजा तावडे, दिलीप सावंत, संजना पाटकर, स्रेहा दळवी, एकनाथ भोगले, अशोक घोगळे, सुभाष सावंत, साजूराम नाईक, योगेश ठाकूर, प्रदीप गावडे, हंशराज चव्हाण आदींसह शाळेतील मुलांसह निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)