शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

दलित अत्याचाराविरोधात मोर्चा

By admin | Updated: October 31, 2014 23:30 IST

जावखेडे हत्याकांडाचा निषेध : सूत्रधारांना अटक करण्याची मागणी

कणकवली : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जावखेडे गावातील जाधव कुटुंबीयांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीच्यावतीने कणकवलीत शुक्रवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार संतोष खरात यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन शिष्टमंडळाने दिले. नगरमधील हत्याकांडाच्या सूत्रधारांना तत्काळ अटक करावी, हत्येच्या चौकशीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन करण्यात यावे, दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये गुन्हेगार का सुटतात? याचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ समिती स्थापन करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.जावखेडे येथील संजय जाधव, जयश्री जाधव व त्यांचा मुलगा सुनिल यांची भीषण हत्या करण्यात आली. आधी खैरलांजी नंतर खर्डा आणि आता जावखेडे येथील ही जातीय अत्याचाराची तिसरी घटना आहे. या घटनेने महाराष्ट्रातील दलित समाज कधी नव्हे इतका हादरून गेला आहे. खैरलांजी हत्याकांडात महाराष्ट्र सरकारने गुन्हेगारांनाच अभय देण्याची भूमिका घेतल्याने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. किंबहुना अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा हेतूपुरस्सर कमजोर करण्यात आल्याने दलित अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत. जातीय अत्याचारापासून मुक्ती मिळण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक संरक्षण मिळवून दिले. मात्र, या कायद्यांची कठोर अंमलबजावणी सत्ताधाऱ्यांनी टाळल्याने दलित अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत.खैरलांजी हत्याकांडानंतर दलित समुदायाने तीव्र आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार दलितांवरील जातीय अत्याचाराबद्दल गंभीर नाही, हे जावखेडे येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाने सिद्ध झाले आहे. नगर जिल्ह्याला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्र सरकारने तातडीने घोषित करून प्राधान्याने तेथील दलितांच्या सुरक्षेबाबत गंभीर पावले उचलणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात प्रा.राजेंद्र मुंबरकर, सुरेश कदम, प्रमिता तांबे, विनायक हरकुळकर, स्वाती तेली, प्रदीप सर्पे, सुदीप कांबळे, सिद्धार्थ तांबे, व्ही.जी.कदम, अमोल कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)