शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू भरतीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 22, 2015 01:08 IST

कृषी विद्यापीठ : निकष बदलले; संचालक पदाऐवजी विभागप्रमुखपदाचा पर्याय

शिवाजी गोरे / दापोली राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू पदासाठी पात्र उमेदवारांना पाच वर्षे संचालक पदाचा अनुभव असावा, ही अट रद्द करून सरकारने पाच वर्षांचा विभागप्रमुख (हेड आॅफ द डिपार्टमेंट) पदाचा अनुभव ग्राह्य धरण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उदयोन्मुख शास्त्रज्ञांना कुलगुरूपदी संधी मिळणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे सेवानिवृत्त होण्याअगोदर सरकारने निवड समिती नेमली होती. या समितीने पात्र उमेदवाराचे अर्ज मागवून घेतले. छाननी होऊन पात्र उमेदवाराच्या मुलाखती झाल्या. परंतु या समितीने या पदासाठी लायक उमेदवार न मिळाल्याने भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचा अहवाल सरकारला दिला. पाच वर्षे संचालकाचा अनुभव असणारा पात्र उमेदवार मिळाला नसल्याने ही निवड प्रक्रिया रद्द झाली. तत्कालीन कुलगुुरू डॉ. किसन लवांडे याचा कार्यकाल १९ डिसेंबर २०१४ रोजी संपत असल्याने परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांच्याकडे २० डिसेंबर २०१४ रोजी अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. ७ महिने दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा कार्यभार परभणी कृषी विद्यापीठातून सुरू आहे. हक्काचा कुलगुरू नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. कृषी विद्यापीठात गेली पाच वर्षे संचालक पदेच भरण्यात आली नाहीत. त्यामुळे राज्यातील संचालकाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही. तरीही कुलगुरू पदासाठी पाच वर्षांची अट कायम असल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठात एकही उमेदवार निकषात बसत नव्हता. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी एकही लायक उमेदवार नसल्याचा अहवाल निवड समितीने सादर केल्यानंतर सरकारचे डोळे उघडले. विद्यापीठाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी कुलगुरुंची गरज असते. मात्र, कुलगुरूच नसेल, तर विद्यापीठाचा कारभार कसा चालणार असा प्रश्न सरकारला पडला. राज्यातील कृषी विद्यापीठाकडून कुलगुरू पदाचे निकष काय असावेत, असा अहवाल मागविण्यात आला. राज्यपालांनी सूचना मागितल्यानंतर कुलगुरुपदाच्या निकषाबद्दल हालचाली सुरू झाल्या. या एकूणच प्रक्रियेची आणि कुलगुरू निवडीतील निकषाची गोम ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याची दखल घेत सरकारने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांकडून निकषाबाबतच्या सूचना मागविल्या. १२ फेब्रुवारी २०१५ रोजी लोकमतने ‘राज्यातील कुलगुरुपदाचे निकष बदलणार, कृषी विद्यापीठाच्या संचालकांची अट रद्द होणार’ अशा स्वरूपाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त खरे ठरले आहे. ‘लोकमत’चा पाठपुरावा १) कृषी विद्यापीठात कायमस्वरूपी कुलगुुरू नसल्याने विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यावर परिणाम होऊ शकतो. राज्यातील कृषी विद्यापीठात कुलगुुरू पदासाठी पात्र उमेदवार नसेल, तर सरकारने कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचे निकष बदलायला हवेत. यासाठी ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला होता. २) कृषी विद्यापीठातील प्राध्यापक व त्यावरील पदे २००८ पासून भरण्यात आली नाही. असे असताना पाच वर्षे संचालकाची अट ही राज्यातील कृषी विद्यापीठांना जाचक आहे. ३) कुलगुरुपदाच्या या अटीमुळे राज्यातील उदयोन्मुख शास्त्रज्ञांना संधी मिळणार नाही. ही अट रद्द व्हावी यासाठी १५ जानेवारी २०१५, १२ फेब्रवारी २०१५, १० एप्रिल २०१५ असा अनेकवेळा ‘लोकमत’ने या विषयावर प्रकाश टाकला होता. त्याची दखल सरकारने घेतली आहे.