मंदिर बांधायचे सांगून उकळले लाखो रुपये; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:22 IST2025-01-13T12:22:19+5:302025-01-13T12:22:42+5:30
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग ) : बंजारा समाजाचे मंदिर बांधायचे असल्याचे सांगून जिल्ह्यातील अधिकारी, तसेच काही ठेकेदारांना मंदिरासाठी पावती फाडा ...

संग्रहित छाया
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : बंजारा समाजाचे मंदिर बांधायचे असल्याचे सांगून जिल्ह्यातील अधिकारी, तसेच काही ठेकेदारांना मंदिरासाठी पावती फाडा असे सांगून लाखो रुपये उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडला आहे. याचा फटका काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बसला असून, त्यांनी याबाबत सायबरकडे तक्रार दिली आहे.
‘मी राठोड बोलतोय, आम्ही बंजारा समाजाचे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथे बांधत आहोत. तुम्हाला स्वेच्छेने काही मदत करायची असेल तर करा,’ म्हणून सांगत तुम्हाला शक्य असेल तर गुगल पे करा. तुमचे गुगल पे झाल्यानंतर मी तुम्हाला रीतसर पावती पाठवतो असे सांगत असे.
त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी खरोखरच मंदिर बांधायचे असेल म्हणून काही रक्कम गुगल पेद्वारे पाठविली होती. पण, या ठकसेनची मागणी नंतर नंतर वाढत गेली आणि त्याने अधिकाऱ्यांना सतत फोन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी थेट त्याची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात केली.