शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

‘फूड फेस्ट’ने वाढवली ‘छंदोत्सवा’ची लज्जत

By admin | Updated: December 29, 2014 23:43 IST

कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘फूड फेस्ट’ सर्वांच्या चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरला.

रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा छंदोत्सव म्हणजे नवनवीन कल्पना असे समीकरण यावर्षीच्या छंदोत्सवातही ‘फूड फेस्ट’च्या माध्यमातून सर्वांनी अनुभवले. ‘जो खाईल इथे फूड उसका बन जायेगा मूड’ हे घोषवाक्य घेऊन आलेला कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘फूड फेस्ट’ सर्वांच्या चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरला.एकूण १५ गटांचे १५ स्टॉल्स १५ प्रकारचे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांसाठी देण्यास सज्ज झाले. छंदोत्सवाच्या तीन दिवसात दररोज ५ स्टॉल्स ठेवण्यात आले. जवळपास १५० विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग या उपक्रमात होता. उत्पादन, जाहिरात, विक्री, संवाद, व्यवस्थापन, सादरीकरण, जमाखर्च, स्वच्छता, पर्यावरणीय दृष्टीकोन अशी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसीत व्हावीत, हा दृष्टीकोन या उपक्रमामागे आहे. उपप्राचार्य डॉ. श्रीकृ ष्ण जोशी, प्रा. माधव पालकर, प्रा. श्रीकांत दुदगीकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. वैभव कानिटकर यांनी काम पाहिले.छंदोत्सवाच्या पहिल्या दिवशी हॉटेल उद्योजक उदय लोध यांच्याहस्ते या फूड फेस्टचे उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी टेम्प्टेशन, फुडीच, यम्मी अ‍ॅण्ड मम्मी, एफसी आणि फुड मेनिया या स्टॉल्सवर शेजवान सॅण्डविच, कोल्ड कॉफी, अमेरिकन चाट, कॉर्नबॉल, कोळाचे पोहे या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.फूड फेस्टचे परीक्षण प्रा. माधव पालकर, प्रा. सीमा बोंद्रे, प्रा. हिराजी शेजवळ यांनी केले. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. (प्रतिनिधी)