शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या पाच भट्ट्या उद्ध्वस्त

By admin | Updated: January 14, 2015 00:34 IST

मिरजोळेतील घटना : महिलेसह सातजणांना अटक; दोन केंद्रांवरही छापे

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभाग भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत आज, मंगळवारी पहाटे तालुक्यातील मिरजोळे येथील गावठी हातभट्टी दारूच्या पाच भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. तसेच हातभट्टी विक्री केंद्रांवरही छापे टाकले. या कारवाईत सात गुन्हे दाखल केले असून, सातजणांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. या कारवाईत १ लाख २९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रत्नागिरीच्या उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. मिरजोळे नाखरेकरवाडी येथील पाच हातभट्ट्यांवर पहाटे धाड टाकून ४८०० लिटर गावठी दारूचे रसायन नष्ट करण्यात आले. मिरजोळे-कोकणनगर -रत्नागिरी मार्गावर दुचाकीवरून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या सुनील सदाशिव जाधव (रा. मिरजोळे - बौद्धवाडी) यालाही पथकाने अटक केली. क्रांतिनगर येथील गावठी दारू विक्री केंद्रावर छापा टाकून एक गुन्हाही पथकाने नोंदविला असून, शहनाज जमीर मुजावर (रा. कोकणनगर, रत्नागिरी) या महिलेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक अतुल पाटील, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, जवान विजय हातिसकर, करणसिंग घुणावत, राम पवार, महिला जवान अनिता डोंगरे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)