शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रश्मी जोयसर विद्यापीठात प्रथम

By admin | Updated: December 29, 2014 00:01 IST

वाणिज्य पदवी परीक्षेत विक्रमी गुण

खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी रश्मी विनोद जोयसर हिने तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत ९५.१४ टक्के गुण मिळवून मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.वाणिज्य शाखेमध्ये ८६ हजार विद्यार्थ्यांमधून तिने हे यश संपादन केले. सातपैकी चार विषयात ती प्रथम आहे. फायनान्शिअल अकौंटिंग अ‍ॅण्ड आॅडिटिंगमध्ये ३००पैकी २९४, बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये १००पैकी ९३ गुण प्राप्त केले आहेत. विद्यापीठाच्या सीजीपीएसचे ७ गुण व ओ ग्रेड तिला प्राप्त झाली आहे. या यशाबद्दल मुंबई विद्यापीठात कुलगुरु राजन वेळुकर यांच्या उपस्थितीत तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. मधू नायर यांनी रश्मीचे विशेष कौतुक केले. यापूर्वीच्या विविध परीक्षांमध्ये तिने उत्तुंग यश मिळवित ज्ञानदीप महाविद्यालयाचे नाव रोशन केले होते. या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळावे, या हेतूने २००९ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने अल्पावधीत मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर गडदे (पनवेल), ए. पी. महाजन (डोंबिवली), डॉ. माधवी पेठे (विलेपार्ले), गोपाळ कलकोटी (मालाड), अशोक वाघ (भिवंडी), सी. ए. प्रदीप कामथेकर (माटुंगा) व ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रशांत कुलकर्णी, सल्लागार मंडळातील सदस्य विजयचंद्र थत्ते, श्रीरंग बापट, ए. व्ही. कुलकर्णी, सॉलीसिटर शरद चिटणीस, उमेश बागल, मारुती आढाव, शीतल जारकोई, चंद्रसेन घुंबरे, अतुल आगलावे, संदीप यमकर, विठ्ठल सकुंडे, भरत गोंजारी, दीपक जाधव यांचे तिला मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, माधव पेठे, प्रकाश गुजराथी, विनोंद बेंंडखळे, अप्पा पाटणे, रमणलाल तलाठी, पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, राकेश प्रसादे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, दीपक लढ्ढा, अनिल शिवदे, प्राचार्य भरत मोरे, राजकुमार मगदूम, पुर्वा मोरे व सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)