देशद्रोह्यांवर गुन्हे दाखल करा

By Admin | Updated: August 9, 2015 21:17 IST2015-08-09T21:17:21+5:302015-08-09T21:17:21+5:30

सावंतवाडीत निदर्शने : राष्ट्रीय हिंदू आंदोलनाकडून मागणी

Filing crimes against sedition | देशद्रोह्यांवर गुन्हे दाखल करा

देशद्रोह्यांवर गुन्हे दाखल करा

सावंतवाडी : निष्पाप २५७ नागरिकांच्या मृत्यूला कारण ठरलेला देशद्रोही आतंकवादी याकूब मेमनला न्यायालयीन प्रक्रिया राबवून २२ वर्षांनंतर न्यायालयाने फाशी सुनावली. या देशद्रोही आतंकवाद्याचे समर्थन करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनच्यावतीने करण्यात आली. येथील गांधी चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलनतर्फे रविवारी निदर्शने करण्यात आली. याकूबसारख्या देशद्रोह्याचे लांगूलचालन कायमस्वरूपी रोखण्यासाठी, आतंकवाद्याला सर्वाेच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यास आणि राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यास त्यावर कोणतीही वाहिनी अथवा सभा याद्वारे चर्चा करता येणार नाही, असा सक्षम कायदा बनवावा. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते वाहतुकीसाठी असल्याने तिथे जर उत्सव साजरे करता येत नसतील, तर रस्ते, रेल्वे फलाट अशा सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्यावरही बंदी घालावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार कोल्हापूर येथील श्री अंबाबाई देवस्थानातील माणिकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून कुंड भाविकांसाठी तत्काळ खुले करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सीताराम म्हापणकर, दिनेश रेडकर, चंद्रकांत बिले, भरत राऊळ, जीवन केसरकर, संदेश गावडे, राजा मळेवाडकर, एकनाथ सावंत, गीतेश परब, गणेश पांगम, सुप्रिया चव्हाण, पल्लवी पेडणेकर, संतोष परब, रंजना राऊळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Filing crimes against sedition