शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात खासगी तत्त्वावर फुडपार्क

By admin | Updated: February 28, 2016 01:02 IST

शंभर एकरात प्रकल्प : २०० कोटींची गुंतवणूक; २२ उद्योगांचा समावेश

अनंत जाधव ल्ल सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बजाज हेल्थ केअर कंपनी खासगी तत्त्वावर फुडपार्क प्रकल्प उभारत असून, या माध्यमातून कंपनी दोनशे कोटींची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पासाठी जागेची चाचपणी सध्या सुरू आहे. जागेसाठी पहिली पसंती सावंतवाडी परिसराला देण्यात आली आहे. हा फुडपार्क प्रकल्प शंभर एकर जागेत होणार आहे. त्यामध्ये २२ वेगवेगळे उद्योग उभारण्यात येणार आहेत. या फुडपार्कच्या माध्यमातून पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा कृषी विभागाकडून पणन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळाले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फुडपार्क प्रकल्पासाठी मोठा वाव आहे. येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बागायती असून, त्या माध्यमातून शेतकरी वेगवेगळे उत्पादन घेत असतो. पण त्यांच्या मालाला हवी तशी किंमत मिळत नाही. यासाठी बजाज हेल्थ केअर ही कंपनी फुडपार्कच्या माध्यमातून येथील आंबा, केळी, फणस, चिकू, स्ट्रॉबेरी, टॉमेटो, पेरू, कोकम आदी लागवडीला विशेष प्रोत्साहन देणार आहे. या धर्तीवर बजाज कंपनीच्यावतीने माणगाव तसेच आंबोली येथे मोठ्या प्रमाणात टॉमेटोची लागवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखादा फळ लागवडीवर प्रक्रिया करणारा उद्योग उभारल्यास त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बजाज कंपनीला आग्रह केला होता. त्यानंतर कंपनीने सिंधुदुर्गमध्ये प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. कंपनी तब्बल दोनशे कोटींची गुंतवणूक करून फुडपार्क प्रकल्पाची उभारणी करणार आहे. फुडपार्क प्रकल्प शंभर एकर जागेत असून, त्यात २२ प्रकिया उद्योग उभारले जाणार आहेत. बजाज कंपनीने फुडपार्क उभारणीसाठी पहिले प्राधान्य सावंतवाडी परिसराला दिले असून, मळेवाड, आजगाव धाकोरे आदी गावांमध्ये कंपनीने जागेची चाचपणी केली. पण त्यांना हवा तसा पाण्याचा पुरवठा अद्याप सापडला नाही. त्यामुळे कंपनीने सावंतवाडीबरोबरच दोडामार्ग तालुक्यातही जागेसाठी चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, कंपनी खासगी तत्वावर फुडप्रकल्प उभा करीत असल्याने या पार्कला केंद्र सरकारची मंजुरी गरजेची आहे. कंपनीचा प्रस्ताव जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून राज्याच्या कृषी व पणन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर तो केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी जाणार आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या उभारणीस रितसर सुरूवात होणार आहे. फुडपार्कमुळे विकासाला गती मिळेल : केसरकर सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात फळ लागवड सुरू आहे. मात्र, त्यांना योग्य अशी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळेच खासगी तत्त्वावर फुडपार्क प्रकल्प उभारण्यात येणार असून, या माध्यमातून थेट ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला लवकरच सरकारकडून मान्यता मिळवून देण्यात येणार असल्याचे राज्याचे ग्राम विकास व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.