जागाच न दिल्याने भर रस्त्यात उपोषण

By Admin | Updated: January 29, 2015 23:37 IST2015-01-29T21:59:12+5:302015-01-29T23:37:42+5:30

परवानगी धाब्यावर : अधिकाऱ्यानेच दिला अजब सल्ला...

Fearlessly in the street without giving space | जागाच न दिल्याने भर रस्त्यात उपोषण

जागाच न दिल्याने भर रस्त्यात उपोषण

सावंतवाडी : उपोषण प्रांताधिकारी कार्यालयासमोर पण उपोषणकर्त्याला जागा दाखविली ती नगरपालिकेच्या रस्त्याची, असा अवहेलनात्मक प्रकार प्रजासत्ताक दिनी घडला. सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासमोर डेगवे येथील संजय देसाई यांनी पूर्व परवानगीने उपोषणाची मागणी केली होती, यासंदर्भातील निवेदनही त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाकडे पूर्वीच दिले होते. त्यानुसार देसाई हे उपोषण करण्यासाठी आले. त्यांनी प्रथम प्रांताधिकारी कार्यालयाची परवानगी घेऊन उपोषणास कुठे बसू, असे विचारले. तेव्हा तेथे असलेल्या नायब तहसीलदार विजय वरेरकर यांनी ‘कार्यालयाच्या बाहेर करा उपोषण’, असा अजब सल्ला देताच देसाई आश्चर्यचकित झाले. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासमोरच हा प्रकार घडला. ‘उपविभागीय कार्यालयाची शेड उपोषणासाठी आहे का?’ असा सवालही त्यांनी केला. कार्यालया बाहेरचा रस्ता पालिकेचा असून, तेथे उपोषणास बसविणे चुकीचे असल्याचे प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. वरेरकर यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमोरच प्रांताधिकारी कार्यालयाची शेड उपोषणासाठी बांधली नसल्याचे बजावले. प्रत्यक्षात मात्र तेथे मायनिंग विरोधात काहीजण उपोषणास बसले होते. प्रांताधिकाऱ्यांनी अखेर तोडगा काढत मायनिंग डंपरवर क्लिनर ठेवणे, वेगावर मर्यादा, रात्री मायनिंग वाहतूक बंद ठेवणे, या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
उपोषण कार्यालयाबाहेर ?
डेगवेचे संजय देसाई सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण केले. त्यांनी प्रांत कार्यालयाकडे निवेदन यापूर्वीच दिले होते. त्यानुसार देसाई हे उपोषणासाठी आले असता त्यांनी प्रथम प्रांताधिकारी कार्यालयाची परवानगी घेऊन उपोषणास कुठे बसू, असे विचारले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या नायब तहसीलदार वरेरकर यांनी ‘उपोषण कार्यालयाबाहेर करा’ असा अजब सल्ला दिला.

Web Title: Fearlessly in the street without giving space