शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याच्या भीतीने बिबट्याशी वैर नको

By admin | Updated: November 23, 2014 23:51 IST

प्रकाश आमटे : उभ्या राहिलेल्या व्यक्तीला धोका नाही; माणसांचे बोलणे ऐकूनही ‘तो’ दूर जातो

राजीव मुळ्ये -- सातारा -बिबट्या माणसावर सहसा हल्ला करीत नाही. तो आपल्यावर हल्ला करेलच, असे गृहित धरून त्याच्याशी वैर करू नका, असा कानमंत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी पश्चिम घाटातील ग्रामस्थांना दिला आहे. विकासाची प्रक्रिया पर्यावरणाचे संतुलन राखणारी असावी, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी ‘लोकमत’ला विविध मुद्द्यांवर अनुभवाचे बोल सांगितले. परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन नव्यानेच होऊ लागले आहे. उसाच्या शेतात दबा धरून बसणारा बिबट्या कधी प्रवासी वाहनावर उडी घेताना, तर कधी शेतात मृतावस्थेत आढळून येत असल्याने अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याविषयी बोलते केले असता डॉ. आमटे म्हणाले, ‘बिबट्या माणसावर सहसा हल्ला करीत नाही. खाली वाकलेली व्यक्ती, शौचाला बसलेली व्यक्ती अशी त्याच्यापेक्षा कमी उंचीची आकृती दिसली, तरच तो हल्ला करण्याची शक्यता असते. एरवी माणसाच्या जवळपास तो फिरकत नाही. भीती असणाऱ्या गावांतील ग्रामस्थ केवळ गप्पा मारत शेतात गेले, तरी त्या आवाजाने बिबट्या दूर राहील.’पाळीव जनावरांवरील हल्ले वाढत असल्याने बिबट्या शेतकऱ्यांना शत्रू वाटू लागला आहे, हे निदर्शनास आणून देताच त्यांनी अनेक उपाययोजना सुचविल्या. ‘पाळीव प्राण्याची शिकार वन्यजीवांकडून झाल्यास नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे, ती सुटसुटीत करायला हवी. पंचनामा आणि भरपाई तातडीने मिळायला हवी. घटना वनखात्याच्या हद्दीत घडली की गावठाणात, असे घोळ न घालता भरपाई मिळू लागल्यास शेतकरी बिबट्याला शत्रू मानणार नाहीत,’ असे ते म्हणाले. घातक प्रकल्पांना विरोध हवागोंदिया जिल्ह्यात वनजमिनीत होऊ घातलेला औष्णिक ऊर्जा प्रकल्प, मुळशी तालुक्यात होऊ घातलेले आणखी एक खासगी हिलस्टेशन अशा प्रकल्पांकडे लक्ष वेधले असता, ‘निसर्गरक्षण आणि विकास या प्रक्रिया हातात हात घालून व्हायला हव्यात,’ असे मत डॉ. आमटे यांनी व्यक्त केले. ‘घातक प्रकल्पांना स्थानिकांनी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध करावा. दुर्दैवाने, आर्थिक हितसंबंध प्रत्येक वेळी प्रबळ ठरतात आणि विकासप्रक्रियेत पर्यावरणाला जणू स्थानच नाही, असे वातावरण निर्माण केले जाते. ही प्रक्रिया योग्य नाही,’ असे ते म्हणाले. ‘सोशल वाघां’ना सल्लावाघ, बिबटे आणि इतर वन्यजीवांचे फोटो आणि त्यांचा आढळ असलेली ठिकाणे हल्ली सोशल मीडियावर सर्रास फिरत असतात. अशा ‘सोशल वाघां’ना डॉ. आमटे यांनी सबुरीचा सल्ला दिला. ‘खोटी माहिती, फोटो प्रसिद्ध करणे तर टाळाच; परंतु खरोखर एखादा वन्यजीव कुठे आढळला असेल, तरी त्याचा फोटो ‘सोशल मीडिया’वर टाकू नका. अशा माहितीमुळे शिकारी सावध होण्याचा आणि दुर्मिळ वन्यजीवांची संख्या आणखी रोडावण्याचा धोका आहे,’ असे ते म्हणाले.