शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाविरुद्ध उपोषण करण्याचा इशारा

By admin | Updated: January 5, 2015 22:05 IST

वरवडे ग्रामस्थांचे निवेदन : ठरल्याप्रमाणे कार्यवाही न केल्यामुळे नाराज

कणकवली : तालुक्यातील वरवडे शाळा नं. १ मध्ये कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक प्रदीप मांजरेकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी दिला आहे.या शिक्षकामुळे शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांना त्रास होत आहे. त्यामुळे या शाळेतून त्यांना १५ दिवसांत अन्यत्र कामगिरी न दिल्यास विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ उपोषण करतील, असे निवेदन गटशिक्षणाधिकारी अनिल कांबळे यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश घाडीगांवकर आणि ग्रामस्थांनी दिला आहे.वरवडे शाळा नं. १ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घाडीगांवकर, आबा शिवडावकर, अजय घाडीगांवकर, दिनकर चव्हाण, विजय कडुलकर, वरवडेचे उपसरपंच आनंद घाडीगांवकर यांच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली आणि निवेदन सादर केले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य महेश गुरव उपस्थित होते.बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये समूहनृत्य तसेच समूहगान स्पर्धेत भाग घेण्यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा केली होती. या बैठकीत ठरल्यानुसार कार्यवाही होणे आवश्यक होते. मात्र, तसे न होता अंगणवाडी मदतनीससह काही महिलांना गावातील ग्रामस्थांकडे पैसे जमा करण्यास पाठविण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीने याला आक्षेप घेत तातडीने बैठक बोलावली. मात्र, मांजरेकर यावेळी रजेवर होते. शाळा व्यवस्थापन बैठकीत जमा केलेले पैसे परत करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. त्यानंतर बिडवाडी केंद्रस्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये वरवडे शाळा नं. १चा समहूनृत्य व समूहगीत गायनासाठीचा संघ सहभागी झाला नाही. याची जबाबदारी मांजरेकर यांच्यावर होती. मांजरेकर यांच्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत असून त्यांना आमच्या शाळेतून वरवडे गाव वगळून इतरत्र कामगिरीवर पाठवा. (वार्ताहर)गटशिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधलेगटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरवडे शाळा नं. १ मध्ये कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक प्रदीप मारुती मांजरेकर यांची कार्यपद्धती योग्य नसल्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत असून त्यांना आमच्या शाळेतून वरवडे गाव वगळून इतरत्र कामगिरीवर काढण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी केली आहे.