शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पैसे हडपण्याचा प्रयत्न शेती मित्रांनी उधळला

By admin | Updated: January 14, 2015 00:33 IST

शेतकरी सध्या शांत आहेत. मात्र, वस्तूएवढ्या किमतीचे पैसे घेतले, तर आम्ही गप्प बसू, अन्यथा आंदोलन छेडू

सावंतवाडी : पाणलोट विभागाच्या ‘आत्मा’ सदस्यांतून ४२ शेतकऱ्यांची २०१३ व २०१४ मध्ये ‘शेती मित्र’ म्हणून निवड करून त्यांना नागरपूर सहलीला नेले होते. मात्र, शेतकऱ्यांना स्वत:चेच पैसे खर्च करण्यास लावून त्यांच्यासाठी शासनाकडून आलेले पैसे परस्पर हडप करण्याचा डाव शेती मित्रांनी उधळून लावला असून, या शेतकऱ्यांना आता प्रत्येकी २ हजार २१६ रुपये वस्तू स्वरुपात मिळणार आहेत.तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांना ‘आत्मा’ अंतर्गत कृषी सहलीसाठी नागपूर येथे नेण्यात आले होते. यासाठी शासन निधीतून निम्मा खर्च तसेच नेण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा स्वत:चा निम्मा खर्च, अशी अट घालण्यात आली होती. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सहलीसाठी गेल्यावर स्वत:चे पैसे खर्च केले. मात्र, कृषी विभागाने एक रुपयाही खर्च केला नाही. तसेच नागपूर येथे सहलीसाठी नेलेल्या शेतकऱ्यांना शेती अभ्यास दौऱ्यासाठी फिरवण्याऐवजी धर्मस्थळे दाखविण्यात आली. या दरम्यान त्यांना एका धर्मशाळेत ठेवण्यात आले होते.सहल सावंतवाडीत परतल्यानंतर शेतकऱ्यांनी खर्चाचा हिशेब मागितला. त्यावेळी कृषी अधिकारी आय. डी . गुरव व इतर अधिकाऱ्यांनी शेती मित्रांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत, सर्व पैसे खर्च झाले, आता पैसे कोठून देऊ, अशी उत्तरे देत अनेक वेळा बैठकीतूनच काढता पाय घेतला. त्यामुळे संतप्त शेतीमित्रांनी याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. अखेर सर्व शेतकऱ्यांनी आठवडाभरात आमचे पैसे मिळाले नाहीत, तर उपोषण करण्याचा इशारा २८ डिसेंबर २०१४ रोजी दिला होता.कृषी विभागाच्या अधिकारी स्तरावर याबाबत बैठक झाली. दोन दिवसांपूर्वी शेतीमित्रांना त्यांच्या वाट्याचे २ हजार २१६ रुपये देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. मात्र, हे पैसे वस्तू खरेदीतून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मळगाव येथील दुकानात इंधन चुली आणण्यात येतील, त्या चुली या शेतीमित्रांनी घ्याव्यात आणि त्यांची बिले कृषी विभागाला द्यावीत, नंतरच हे पैसे प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होतील, असा आदेश काढला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या शांत आहेत. मात्र, वस्तूएवढ्या किमतीचे पैसे घेतले, तर आम्ही गप्प बसू, अन्यथा आंदोलन छेडू. असा इशारा शेतीमित्रांनी दिला आहे. (प्रतिनिधी)