शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण किनारपट्टीला प्रदूषणाचे ग्रहण

By admin | Updated: January 3, 2015 00:14 IST

नियंत्रण मंडळाचा ठपका : मुरुड, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, पावसला प्रदूषण कमी

सुभाष कदम : चिपळूण  :राज्याला ७२० किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा ठपका समुद्र विज्ञान प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील काही भाग रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील किनारपट्ट्या तुलनेने कमी प्रदूषित असल्याचे अहवालात म्हटले आहे. वाढते औद्योगिकीकरण, घरगुती सांडपाणी, औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी, खत कारखाने, ऊर्जा प्रकल्प आदीच्या सांडपाण्यामुळे समुद्राचे पाणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागले आहे. वाढते शहरीकरण, झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण आणि कोणत्याही प्रक्रियेविना समुद्राच्या पाण्यात सोडण्यात येणारे रासायनिक प्रदूषित घटक यामुळे मासेमारी व समुद्रातील जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. राज्यातील १८ खाड्या व नद्यांच्या मुखाजवळील प्रदूषण चिंताजनक आहे. मुंबई उपनगर, तारापूर, वसई, मनोरी, वर्सोवा, वांद्रे, माहीम, वरळी, ठाणे, पाताळगंगा व अलिबाग येथील किनारपट्टी अधिक प्रदूषित आहे. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच रासायनिक व तेल कंपन्यांचे दूषित पाणी, गटार व नाल्यातून येणारे सांडपाणी याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि परिसरातील सागरी जैवविविधतेवर होत आहे. मुंबईपासून ३० ते ३५ किलोमीटरपर्यंत समुद्रात प्राणवायू नसल्याने माशांची पैदास होत नाही. रासायनिक प्रक्रिया न करता नद्या किंवा खाड्यांमध्ये सोडलेले पाणी जलचरांसाठी धोकादायक झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड आणि जैतापूर येथील औष्णिक प्रकल्पामुळे जलचरांचे प्रमाण घटत चालले आहे. शहरीकरणासाठी समुद्रात टाकण्यात येत असलेला भराव व प्रदूषणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मुंबई व ठाणे परिसरातील अनेक खाड्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने भविष्यात हा धोका वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचे प्रमाण कमी असल्याने हा किनारा काहीअंशी सुरक्षित आहे. मात्र, जैतापूरसारख्या प्रकल्पामुळे व लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणामुळे भविष्यात येथेही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्रकल्पाबाबत नाराजी आहे. या प्रकल्पाचा स्थापनेपासून मेंटेनन्स झालेला नाही. येथील पंखे गंजलेले आहेत. त्यामुळे सांडपाणी घुसळण्याची प्रक्रिया नीट होत नाही. सीईटीपी मानके पाळत नसल्याने रासायनिक कारखाने किंवा स्थापित उद्योगांना विस्तारिकरणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. सांडपाणी दाभोळ खाडीत सोडण्याची सध्याची व्यवस्था आणखी २५ मीटर वाढविण्याची मागणी एमआयडीसीने मंजूर केली आहे. त्याला येथील स्थानिक भोई समाजाचा विरोध आहे. ती पाईपलाईन पूर्णत: काढून टाकून त्यांची प्रक्रिया केल्यानंतरचे पाणी त्यांनाच वापरण्यास सांगावे व खाडी प्रदूषण टाळावे, असे भोई समाजाचे म्हणणे आहे. अखिल भोई समाजाने गेले अनेक वर्ष सुरू ठेवलेला संघर्षर्संपणार कधी असा प्रश्न विचारला जात आहे. महाराष्ट्राचा समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित आहे. हे समुद्र विज्ञान प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार सिद्ध होते. यावर बंधन घालणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, ही काळाची गरज आहे. काही कंपन्या आपले सांडपाणी जबरदस्तीने रस्त्यावर सोडतात किंवा आजूबाजूच्या प्रदेशात टँकरने सोडतात. कंपनीच्या आवारात बोअरवेल खणून भूगर्भात रिचवतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे द. ना. राजोपाध्ये यांनी सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात तुलनेने कमी प्रदूषित किनारपट्ट्या आहेत. त्यात मुरुड, दाभोळ, गुहागर, जयगड, रत्नागिरी, पावस, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ला, रेडी या किनारपट्ट्यांचा समावेश आहे. या किनारपट्टीवर सध्या प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व्यक्त होतेय चिंता