शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी परिसरात भूकंप

By admin | Updated: July 24, 2015 00:43 IST

तीन रिश्टर स्केलची तीव्रता : केंद्रबिंदू सावंतवाडीजवळ; इमारतींना तडे

सावंतवाडी/बांदा : सावंतवाडी परिसर गुरुवारी सकाळी भूकंपाने हादरला. तीन रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे सौम्य धक्के सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू तिलारी धरणापासून ४० किलोमीटर अंतरावर सावंतवाडीच्या दिशेने असून, या भूकंपाने बांदा येथे दोन घरांना, तर सावंतवाडी शहरातील दोन इमारतींना भेगा गेल्या आहेत. मात्र, जीवितहानी झाली नाही. सावंतवाडी, दोडामार्ग वगळता जिल्ह्यात कुठेही या भूकंपाचे धक्के जाणवले नाही.भूकंपाची दखल शासनाच्या मिरी तसेच पुणे वेधशाळेने घेतली असून कोयनानगर भूमापन केंद्राकडून अहवाल मागविला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू सावंतवाडी परिसर असल्याचे तिलारीचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यात गुरुवारी सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी एकच मोठा आवाज झाला. या आवाजाने सर्वजण हादरून गेले. नेमका हा आवाज कशाचा, हे कुणालाच कळले नाही. सुरुवातीला भूसुरुंग स्फोट, तर काहीजणांनी सिलिंडरचा स्फोट झाला की काय, असे वेगवेगळे निष्कर्ष लावले. मात्र, तालुक्यातील अनेक गावांत या भूकंपाचे धक्के (पान ९वर) घराच्या भिंतींना तडेगुरुवारी सकाळी बांदा शहरात ११ वाजून ३६ मिनिटांनी सुमारे ३ सेकंद भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांनी घरात असणाऱ्या व्यक्ती भयभीत झाल्याने लोकांनी घराबाहेर धाव घेतली. तसेच बाजारपेठेतदेखील व्यापाऱ्यांनी दुकानांबाहेर धाव घेतली. बांदा शहरातील देऊळवाडी येथील महादेव ऊर्फ महेश सावंत मोर्ये व सरपंच मंदार कल्याणकर यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले. तसेच शहरातील विविध घरांमध्ये घरातील भांडी, वस्तू पडण्याच्या घटना घडल्या. तसेच सावंतवाडीतील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या मागे असलेली लक्ष्मीनारायण इमारत व मदर क्विन्स शाळेच्या इमारतीला भेगा गेल्या आहेत. सावंतवाडीत अफवासावंतवाडीत भूकंप झाल्याचे सर्वत्र पसरल्यानंतर माडखोल येथील धरणाला भेगा गेल्या, आंबोलीत घाटात दगड कोसळले, ओटवणे परिसरात खड्डा पडला अशा अनेक अफवांना दिवसभर शहरात ऊत आला होता. तसेच नागपूर येथे दोन दिवसांपूर्वी रस्ता खचल्याचा फोटोही टाकण्यात आला होता. त्यामुळे अनेकजण चांगलेच घाबरून गेले. मात्र, नंतर या अफवा असल्याचे पुढे आले. सावंतवाडी, दोडामार्गात सौम्य धक्केगुरुवारी झालेल्या भूकंपाचा धक्का सावंतवाडी परिसरातील बांदा, सोनुर्ली, मळगाव, माजगाव, चराठा, ओटवणे, इन्सुली, आदी गावांना बसला. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर ठिकाणी धक्के जाणवले नाहीत. दोडामार्ग तालुक्यात काही सौम्य धक्के जाणवले. याची नोंद तिलारी भूमापन केंद्रात झाली आहे.