शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळात डबलबारीसाठी गर्दी

By admin | Updated: September 17, 2014 22:27 IST

जिल्ह्यासह गोव्यातील रसिक उपस्थित

कुडाळ : दरवषीप्रमाणे याहीवर्षी कुडाळ पोलीस ठाणे येथे आयोजित केलेला डबलबारी सामना पाहण्यासाठी जिल्हा तसेच गोवावासीय प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. डबलबारी सामन्याच्या रंगतीबरोबर ही गर्दी वाढतच गेली. या डबलबारी सामन्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे यांच्या हस्ते झाले. कुडाळ पोलीस ठाण्यात गेली अनेक वर्षे पोलीस कर्मचाऱ्यांच्यावतीने गणपती प्रतिष्ठापना करण्यात येते. दरवर्षी येथील गणपतीची २१ दिवस पूजा केली जाते. तर विसाव्या दिवशी डबलबारीचे आयोजन करण्यात येते. या डबलबारी सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार, पोलीस उपनिरीक्षक सतीश कदम, राजेश म्हाडेश्वर तसेच अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. येथील डबलबारीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या डबलबारीत दोन्ही बुवा एकमेकांना प्रश्नोत्तरे विचारतात. म्हणून या डबलबारीला ‘प्रश्नोत्तरांची डबलबारी’ म्हणूनही ओळखले जाते. प. पू. वासुदेवानंद टेंब्ये स्वामी महाराज प्रासादिक भजन मंडळ, विलेपार्ले- मुंबईचे बुवा प्रमोद धुरी व संतोष शितकर बुवा यांच्यात हा डबलबारीचा जंगी सामना रंगला. धुरी बुवांना पखवाज व ढोलकीसाथ संदीप सकपाळ, तर शितकर बुवांना दादा परब यांनी दिली. (प्रतिनिधी)निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या डबलबारीचे आयोजन सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आले होते. एरव्ही रात्रीच्यावेळी डबलबाऱ्या रंगतात. परंतु सायंकाळी साडेचार वाजता सुरू करूनही येथील डबलबारीला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, हे विशेष.