शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग तहसीलदार धारेवर

By admin | Updated: November 23, 2014 23:54 IST

केसरकरांचे लक्ष वेधले : मनमानी करुन लोकांची कामे अडवतात

कसई दोडामार्ग : दोडामार्ग तहसील कार्यालयातून तालुक्यातील सर्वसामान्य लोकांची वेळीच कामे केली जात नाहीत. काही अधिकारी मनमानी कारभार करीत असून नाहक लोकांची कामे रखडून ठेवून त्रास देण्याचे काम करीत असल्याचे सांगत विविध समस्यांकडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी येत्या दहा दिवसात संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व ज्यांची विविध प्रकरणे या कार्यालयात रेंगाळत पडली आहेत, त्या सर्वांची एकत्र बैठक घेतली जाणार असल्याचे आमदार केसरकर यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिले. दोडामार्ग येथील तहसील कार्यालयातील काही अधिकारी जाणूनबुजून नाहक त्रास देत बरीच प्रकरणे रखडून ठेवत आहेत. अशा अनेक समस्या घेऊन तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी शुक्रवारी दोडामार्ग तालुका दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर व तहसीलदार संतोष जाधव यांची तहसील कार्यालयात बैठक घडवून आणली. यावेळी गणेशप्रसाद गवस, पांडुरंग नाईक, तालुका संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर, तालुका संघटक संजय गवस, तालुका सहसंघटक प्रदीप नाईक, उपतालुकाप्रमुख संजय देसाई, गोविंद महाले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जातीच्या दाखल्यांचे प्रस्ताव वेळीच पुढे पाठविले जात नाहीत, नायब तहसीलदार धनंजय मोरे जाणूनबुजून लोकांना नाहक त्रास देतात, नवीन घर बांधणीसाठी बिगरशेतीची अट केवळ दोडामार्ग शहरापुरती मर्यादित असूनही ग्रामीण भागातील नवीन इमारत बांधकामाचे अर्ज टाऊन प्लानिंगकडे पाठविले जातात. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे जमिनींचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत, आदी विविध समस्या यावेळी बाबूराव धुरी यांनी मांंडल्या. या बैठकीत आमदार दीपक केसरकरांनी प्रशासनाची बाजू घेतल्याने काही शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमटत होता. (वार्ताहर)बैठक घेऊन प्रश्न सोडवू : केसरकरयावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले, अशा पध्दतीने तहसील कार्यालयाचा कारभार चालत असेल, तर येत्या दहा दिवसात तहसीलचे सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी व जनतेची बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन दिले. येत्या दहा दिवसात तहसीलच्या अनागोंदी कारभारात सुधारणा न झाल्यास तुम्हाला जाब विचारु,असे बाबूराव धुरी यांनी सांगितले. तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न बाबूराव धुरी यांनी आमदार दीपक केसरकर व तहसीलदार संतोष जाधव यांच्यासमोर मांडले. यावेळी गणेशप्रसाद गवस, पांडुरंग नाईक, प्रकाश रेडकर, संजय गवस आदी उपस्थित होते.