शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

खड्डयांसह विरोधकांचेही विसर्जन : प्रसाद लाड, महाजनादेश यात्रेसाठी पटांगणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 13:21 IST

आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभा होणाऱ्या कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्देखड्डयांसह विरोधकांचेही विसर्जन : प्रसाद लाडमुख्यमंत्र्यांच्या कणकवलीतील सभा पटांगणाची पाहणी

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इतर पक्षातील नेते भाजप मध्ये येत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोकणातील महामार्गावरील जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या खड्डयांसह भाजपच्या विरोधकांचेही विसर्जन करण्यात येईल. असे सूचक विधान भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी येथे केले.कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गात येणार असून कणकवली येथे जाहिरसभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या सभा होणाऱ्या कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी उपस्थित असलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचनाही केल्या. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या दौºयात रस्त्यावर मला एकही खड्डा दिसता नये. त्यांच्या गाड्यांचा ताफा निर्धोक येईल असे रस्ते तयार करा. कणकवली शहरात महामार्गावर लावलेले बॅरिकेट्स आत सरकवा, अन्यथा काढून टाका. असेही ते यावेळी म्हणाले.आमदार लाड यांनी सभास्थळी पाहणी करत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा प्रदेश चिटणिस राजन तेली, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, संदेश सावंत- पटेल आदी उपस्थित होते.कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणाची पाहणी आमदार प्रसाद लाड यांनी केली. यावेळी प्रमोद जठार, संदेश पारकर, राजन तेली, अतुल रावराणे, जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम उपस्थित होते.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राsindhudurgसिंधुदुर्गPrasad Ladप्रसाद लाड