शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गैरसोयीच्या मतदान केंद्रांमुळे नाराजी

By admin | Updated: September 21, 2014 00:25 IST

माडखोल येथील प्रकार

सावंतवाडी : सुमारे २५०० मतदार असलेल्या माडखोल गावात तीन मतदान केंद्रे आहेत. परंतु या प्रत्येक मतदान केंद्राला त्याच्या जवळच्या वाड्या जोडण्याचे सोेडून दुसऱ्या मतदार केंद्राजवळील सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरील वाड्या जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी हे गैरसोयीचे झाले आहे. मतदान केंद्रावर जाण्यासाठी यावेळी नागरिकांना संपूर्ण गावाला वळसा घालून जावे लागणार असल्यामुळे याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.या गावातील मतदान केंद्र क्र. १०४ ला जवळ असलेल्या देऊळवाडी, मधलीवाडी, हरिजनवाडी, घाडीवाडी, ठाकूरवाडी, फुगीवाडी, गवळीवाडी, रेवकोंडवाडी या वाड्या अडीच ते तीन किमी अंतरावरील मतदान केंद्र १०२, १०३ ला जोडण्यात आल्या. तसेच मतदान केंद्र १०२ ला जवळ असलेली वरकोंडवाडी मतदान केंद्र १०३ ला जोडण्यात आली. तर मतदान केंद्र १०३ ला जवळ असलेली मेटवाडी मतदान केंद्र १०२ ला जोडण्यात आली. निवडणूक यंत्रणेच्या या चुकीच्या नियोजनामुळे जवळ मतदान केंद्र असूनही तीन किमी अंतरावरील मतदार केंद्रावर जाऊन मतदारांना मतदानाचा हक्क बजवावा लागतो.ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे मतदान केंद्र १०२ मध्ये वरकोंडवाडी, बेबीवाडी, वरची व खालची धवडकी, धुरीचावाडा समावेश करावा. मतदान केंद्र १०३ मध्ये मेटवाडी, देसाईवाडी, धनगरवाडी, गोठणवाडी, तामळवाडीचा सामावेश करावा. तर मतदान केंद्र १०४ मध्ये डुंगेवाडी, सुतारवाडी, हरिजनवाडी, गवळीवाडी, रेवकोंडवाडी, घाडीवाडी, ठाकूरवाडी या वाड्यांचा सामावेश करावा. याबाबत माडखोल ग्रामसभेत ठराव करून पाठविण्यात आला आहे. परंतु याची योग्य ती दखल घेण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत गावचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष विजय राऊळ, किशोर सौंदेकर, वासुदेव होडावडेकर, आनंद राऊळ आदींनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात ग्रामसभेत ठराव झाल्याप्रमाणे मतदान केंद्राच्या जवळपासच्या वाड्यात मतदान केंद्रात सामाविष्ट कराव्या जेणेकरून त्यामुळे मतदारांची गैरसोय दूर होईल, असे म्हटले आहे.ग्रामस्थांच्या या मागणीचा प्रशासनाने योग्य तो विचार करावा आणि त्यांची समस्या सोडवावी, अशी मागणीदेखील या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. (वार्ताहर)