Sindhudurg-Local Body Election: कणकवलीत भाजपा-शहर विकास आघाडीत थेट लढत, १४ उमेदवारांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:21 IST2025-11-21T17:20:07+5:302025-11-21T17:21:36+5:30
नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी किती उमेदवार रिंगणात.. वाचा

Sindhudurg-Local Body Election: कणकवलीत भाजपा-शहर विकास आघाडीत थेट लढत, १४ उमेदवारांची माघार
कणकवली : कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रक्रियेअंतर्गत आज, शुक्रवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पारकर व नगरसेवक पदाच्या १३ उमेदवारांनी माघार घेतली.
त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आता ३ तर १७ नगसेवकपदासाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे समीर नलावडे तर शहरविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात थेट लढत होईल.
कणकवली तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आले. नगरसेवक पदाचे माघार घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. प्रभाग १ -राजेश राणे , प्रभाग २ -रोहिणी पिळणकर , प्रभाग ३ -शिवम राणे , प्रभाग ४ -श्रेया पारकर , प्रभाग ७ -सोनाली कसालकर, प्रभाग ८ -किशोर कांबळे, विठ्ठल कासले, प्रभाग १२ -साक्षी नेरकर, प्रभाग १५ -सुप्रिया नाईक, प्राजक्त आळवे, प्रभाग १६ - हिरेन कामतेकर, सोहम वाळके, प्रभाग १७ -मयुरी नाईक या उमेदवारांचा सामावेश आहे.