शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

सिद्धिविनायक मंदिर ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का?, नितेश राणे यांचा सवाल

By सुधीर राणे | Published: December 28, 2023 4:38 PM

शिंदे-ठाकरे भेटीने महाराष्ट्राला फायदा

कणकवली: कोरोना काळात फक्त उद्धव ठाकरे  व पाटणकर कुटुंब यांच्यासाठी व्हीआयपी दर्शन सुरू ठेवले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर गणपती पूजेसाठी सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी ११ दिवस ठेवले होते. त्यामुळे सिद्धिविनायक ट्रस्ट म्हणजे ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का? असा सवाल करतानाच इतरांवर टीका करताना संजय राऊत यांनी त्यावर प्रथम बोलावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी गुरुवारी आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राम मंदिर कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून थयथयाट करणे संजय राऊत यांनी थांबवावे. आमंत्रणावरून आम्ही कधी राजकारण केले नसल्याचे राऊत सांगत आहेत. मात्र, यापूर्वी त्यांचा पक्ष सत्तेत असताना मेट्रो, बाळासाहेब स्मारक भूमिपूजन अशा कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस यांना का डावलले होते? मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी या कामांना गती दिली होती आणि मंजूरीपण दिली होती.कोणाला अयोध्येला बोलवावे हे प्रभू श्रीरामाने ठरविले आहे. तुमच्या सारख्या लोकांचे कर्तृत्व पाहून तिथे तुम्हाला बोलवलेले नाही. राहुल गांधींचा पुन्हा एकदा फ्लॉप शो सुरू होत आहे. राऊत यांनी तिकडे जावे. कारण जेथे राहुल गांधींची यात्रा जाणार तेथे काँग्रेस पराभूत होणार हे निश्चित आहे. आमच्या देवाला कोणीही किडण्याप करू शकत नाही. ५०० वर्षा पासून असलेली राम मंदिराबाबतची जनतेची इच्छा आता पूर्ण झाली आहे. हे राऊत यांच्या सारख्याना कळणार नाही. दुसऱ्यांच्या उद्योग समूहावर बोलण्यापेक्षा पाटणकर यांच्याबाबत संजय राऊत यांनी आधी बोलावे.शिंदे-ठाकरे भेटीने महाराष्ट्राला फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. राज ठाकरे हे सातत्याने सामाजिक विषय उचलत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे या दोघांच्या भेटीने महाराष्ट्र राज्याचा फायदाच होईल. असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. तर आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल ते म्हणाले, कोणी ही त्यांच्या सोबत चहा घेतली, बिर्याणी खाल्ली तरी ते महायुती सोबतच राहणार आहेत. हे लक्षात ठेवावे. असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSidhivinayak Devsthanसिद्धीविनायक देवस्थानUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे