शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दीपक केसरकरांना हादरा

By admin | Updated: September 21, 2014 00:35 IST

सावंतवाडी पालिका : नगराध्यक्षांसह अन्य दोन नगरसेवकांचा सेनेत जाण्यास नकार

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेत एकहाती सत्ता असणाऱ्या माजी आमदार दीपक केसरकर यांना चांगलाच हादरा बसला आहे. केसरकर हे राष्ट्रवादी काँॅग्रेसमधून शिवसेनेत गेल्यानंतर पालिकेत शिवसेनेचा गट स्थापन करण्याची प्रकिया सुरू आहे. मात्र, याला तीन नगरसेवकांनी ठेंगा दाखविला आहे. या नगरसेवकांनी शिवसेनेत जाण्यास नकार दिला आहे. या तीन नगरसेवकांमध्ये नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचाही समावेश आहे.सावंतवाडी नगरपालिकेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसला शह देत तत्कालीन आमदार दीपक केसरकर यांनी सर्वच्या सर्व १७ नगरसेवक निवडून आणले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास केसरकरांनी नकार दिल्याने राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वामध्ये त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर होता. त्यातच महिनाभरापूर्वी केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालिकेतील सर्व नगरसेवक हातात शिवबंधन बांधतील, असे वाटत होते. मात्र, त्यातील तीन नगरसेवकांनी सेनेत जाण्यास नकार दिला आहे.विधानसभा निवडणुकीत केसरकर यांचा किंबहुना शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी पालिकेतील नगरसेवक ठिकठिकाणी फिरणार असून, त्यावर राष्ट्रवादीच्या कोणी आक्षेप घेऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे गट स्थापन करून त्या गटाला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, हा गट स्थापन करण्यापूर्वी केसरकरांना या नगरसेवकांनी हादरा दिला आहे. नगराध्यक्ष साळगावकर यांच्यासह नगरसेवक राजू बेग व गोविंद बाळा वाडकर हे केसरकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाण्याला त्यांनी विरोध दर्शविला होता. केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला; तरी या नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान, तरीही १४ नगरसेवकांनी पालिकेत शिवसेनेचा गट स्थापन करण्यास परवानगी दिल्याने पालिकेवर शिवसेनेचाच वरचष्मा राहणार आहे. (प्रतिनिधी)साळगावकर राष्ट्रवादीतचंसावंतवाडी पालिकेचा गट स्थापन करण्यात आला आहे. याबाबत मला कोणतीही माहिती नाही; पण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे. अन्य कोणते नगरसेवक राष्ट्रवादीत राहणार याचीही माहिती नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले.