सुईणींना गौरविण्याचा निर्णय : कदम

By Admin | Updated: July 24, 2015 00:43 IST2015-07-23T22:00:22+5:302015-07-24T00:43:05+5:30

आज सिजरिंगचे प्रमाण वाढले आहे. तरीही सुईणींचे महत्त्व कमी झालेले नाही

Decision to glorify sleeping steps: step | सुईणींना गौरविण्याचा निर्णय : कदम

सुईणींना गौरविण्याचा निर्णय : कदम

दापोली : सुईण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. आई व बाळाची काळजी घेणारी ‘सुईण’ आजही शासन दरबारी दुर्लक्षित आहे. सुईणीच्या कामाचे सामाजिक योगदान लक्षात घेऊन साडी देऊन त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेतला आहे. यापुढे समाजातील दुर्लक्षित घटकाला सन्मानाने जगता यावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दापोलीचे आमदार संजय कदम म्हणाले. दापोली तालुक्यातील १४ सुईणींचा शाल, श्रीफळ, साडी देऊन सन्मान करण्यात आला. स्त्री गरोदर असल्यापासून तर ती प्रसुत झाल्यावर स्त्री व बाळाची सुखरूपपणे नि:स्वार्थीपणे काळजी घेणारी सुईण असते. त्या सुईणीला समाजाकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. आजच्या आधुनिक काळात सुईणीचे महत्व कमी झालेले नाही. डॉक्टरचे सर्व प्रयत्न संपतात. परंतु सुईण आपले प्रयत्न सोडत नाही. त्या स्त्रीची नैसर्गिक प्रसुती करुन दोन जीव वाचवण्याचे महान कार्य सुईणींकडून होत आहे.
आज सिजरिंगचे प्रमाण वाढले आहे. तरीही सुईणींचे महत्त्व कमी झालेले नाही. शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या घटकाला समाजाकडून सन्मानाची वागणूक मिळावी. सरकारकडून त्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन दरबारी आवाज उठविणार असल्याचे आमदार कदम म्हणाले. यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Decision to glorify sleeping steps: step