शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

कणकवलीत सापडला मृतदेह, पोलिसांकडून पंचनामा, मृतदेह ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:03 PM

कणकवली येथील पटकीदेवी मंदिरापासून जवळच असलेल्या मच्छीमार्केटनजीक मोकळ्या जागेत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना दिसून आला. त्यांनी पोलिसांना त्याबाबत कळविले. त्यानुसार घटनास्थळी दाखल झाले.

ठळक मुद्देकणकवलीत सापडला मृतदेह, पोलिसांकडून पंचनामा, मृतदेह ताब्यात नातेवाईकांबाबत शोध मोहीम सुरू

कणकवली : येथील पटकीदेवी मंदिरापासून जवळच असलेल्या मच्छीमार्केटनजीक मोकळ्या जागेत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना दिसून आला. त्यांनी पोलिसांना त्याबाबत कळविले. त्यानुसार घटनास्थळी दाखल झाले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले व पथकाने कुजलेला मृतदेह प्लास्टिकमध्ये भरून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेला. त्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या बॅगेत एक औषधाची चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीवर राजेंद्र म्हाडगुत (३०) असे नाव आढळून आले आहे. त्यामुळे तो मृतदेह त्या नावाच्या व्यक्तीचाच आहे का? याबाबत पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.दरम्यान, राजेंद्र म्हाडगुत नावाचा एक कामगार काही दिवसांपूर्वी कणकवली येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्यानुसार नातेवाईकांची कुडाळ, मालवण, सावंतवाडी तालुक्यात शोधमोहीम पोलीस राबवित आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली मच्छीमार्केटलगत मोकळ्या जागेत एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले व अमोल चव्हाण यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याशेजारी असलेल्या एका बॅगची झाडाझडती करण्यात आली. त्यामध्ये एका डॉक्टरकडे उपचार घेतल्याची चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीवर राजेंद्र म्हाडगुत असे नाव लिहिलेले आहे.तसेच संबंधित व्यक्ती कणकवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करीत होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. तसेच राजेंद्र म्हाडगुत हा सावरवाड-मालवण येथील असल्याचेही सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर सावंतवाडी-सांगेली, कुडाळ या तालुक्यांमध्येही राजेंद्र म्हाडगुत नावाची व्यक्ती होती का? याबाबत पोलीस विभागामार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, बुधवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत पुष्टी मिळू शकली नव्हती. त्यामुळे या मृतदेहाचे गूढ आणखीनच वाढले आहे.त्या मृतदेहाचा चेहरा पडला होता काळा; बघ्यांची मोठी गर्दीसापडलेल्या मृतदेहाला कुजलेला वास येत होता. एका पायाचा काही भाग हिंसक प्राण्यांनी खाल्ल्याची चर्चा घटनास्थळावर होती. या मृतदेहाच्या ठिकाणावरुन जवळ रस्ता असूनही तो कुजेपर्यंत कोणाच्याही निदर्शनास आले नव्हते. साधारणत: गेले २-३ दिवस मृतदेह त्याच जागी कुजलेल्या अवस्थेत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या मृतदेहाचा चेहरा संपूर्ण काळपट पडला होता. प्रथमदर्शनी हा मृतदेह जळालेला असावा अशी चर्चाही कणकवली शहरात रंगली होती. मात्र, तीन दिवसांच्या प्रखर उन्हाने चेहरा जळाल्यासारखा दिसत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

या घटनेची माहिती समजताच तो मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळावरुन मृतदेह पोलिसांनी हलविला. शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या शोधासाठी काही तास ठेवून ती मृतदेह दफन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग