शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

CoronaVirus in Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश; पहिला रुग्ण सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 7:42 PM

CoronaVirus: मंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवास केलेल्या एकाला कोरोनाची लागण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील कणकवलीत कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. १९ मार्चला मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना कर्नाटकमधील कोरोना बाधित रुग्णांशी संपर्क आल्याने कोरोना बाधित झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानं १९ मार्चला आलेल्या मंगलोर एक्सप्रेसने केला होता. कोकण रेल्वेच्या प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने कणकवली रेल्वे स्टेशनवर तपासणी केली. तपासणीनंतर त्या सर्व प्रवाशांना होम क्वॉरेंनटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या.जिल्हा प्रशासनाने मंगलोर एक्सप्रेसमधील प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्याशी साधला होता. त्यावेळी एका रेल्वे प्रवाशाच्या आईला खोकला असल्यानं तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेतून प्रवास केलेल्या तिच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.आई आणि मुलाचे रिपोर्ट तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले होते. हे रिपोर्ट आज मिळाले. त्यातून मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आले. तर आईसह इतर चार जणांचे पाठविलेले रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होम क्वॉरेंटाईन असल्यामुळे इतर कोणाच्या आलेला नाही. मात्र प्रवास करताना त्याच्या सोबत आलेली त्याची बहिण २१ मार्चला मुंबईला गेली. याबद्दलची माहिती जिल्हा प्रशासनाने तातडीने मुंबईच्या यंत्रणेला दिली. मुंबईत तिला तपासणीसाठी ताब्यात घेतलं जाणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या