शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधकच्या कार्यकर्त्यांची डॉक्टरांशी वादावादी

By admin | Updated: July 17, 2015 22:48 IST

वैभववाडी रुग्णालयातील समस्या : 'आरपीआय'चा आंदोलनाचा इशारा

वैभववाडी : ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे १ आॅगस्टपूर्वी रुग्णालयातील गैरसोयी दूर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआयने दिला आहे. दरम्यान पदांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांच्या मुद्द्यावरुन तात्पुरत्या नियुक्तीवर आलेले डॉ. रियाज अत्तार यांच्याशी सत्यशोधक संघटनेच्या कार्यकर्त्यांशी वादावादी झाली.वैभववाडी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. तसेच रक्त व एक्स रे तपासणी केली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची योग्य निदानाअभावी गैरसोय होत आहे. शिवाय आर्थिक भुर्दंड बसत आहे. पावसाळा सुरु असल्याने साथीचे आजार फैलावण्याची शक्यता असताना रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल सत्यशोधक संघटनेचे सुदीप कांबळे, सुभाष कांबळे, कृष्णा कांबळे आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, रवींद्र पवार आदींनी डॉ. अत्तार याची भेट घेऊन रुग्णालयातील गैरसोयींबद्दल विचारणा केली. त्यावेळी डॉ. अत्तार नुकतेच महिलेची प्रसुती करून आले होते. रुग्णालयातील गैरसोयींबाबत डॉ. अत्तार यांना सत्यशोधकच्या कार्यकर्त्यांनी विचारले असता काहीकाळ वादावादी झाली. आपण दोनच दिवसांपूर्वी इथे आलो आहोत. त्यामुळे इथल्या रुग्णालयाच्या परिस्थितीबद्दल मला काहीच माहित नाही, असे डॉ. अत्तार यानी सांगितले. त्यामुळे सत्यशोधकचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यावेळी आपण उद्यापासून रुग्णालयात येणारच नाही, अशी भूमिका डॉ. अत्तार यांनी घेतली. डॉ. अत्तार यांच्याशी झालेल्या वादावादीच्या पार्श्वभूमीवर सुदीप कांबळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक योगेश बिलोलीकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यावेळी पुढील आठवड्यात वैभववाडी रुग्णालयाला भेट देऊन तेथील समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन दिल्याचे कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले.दरम्यान, वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरुन अत्यावशक सुविधा १ आॅगस्टपुर्वी उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आहे. तहसीलदारांना निवेदन देताना आरपीआय जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, प्रथमेश पेडणेकर, रुपेश कांबळे, गौतम गोळवणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)