शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकमध्ये भीषण धडक, कासार्डे-जांभुळवाडीजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 18:11 IST

मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे जांभुळवाडीनजीक असलेल्या रुक्मिणी मंगल कार्यालय येथील महामार्गावरील नवीन बॉक्सवेल ब्रिजवर मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघाताची भीषणता भयानक होती.

ठळक मुद्देदोन ट्रकमध्ये भीषण धडक, कासार्डे-जांभुळवाडीजवळील घटनामहामार्गावर वाहतूक ठप्प; सुदैवाने जीवितहानी नाही

तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे जांभुळवाडीनजीक असलेल्या रुक्मिणी मंगल कार्यालय येथील महामार्गावरील नवीन बॉक्सवेल ब्रिजवर मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघाताची भीषणता भयानक होती.

सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात रविवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडला. यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पर्यायी मार्ग काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.गोव्यावरून आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक लोखंडी सामान भरून पुण्याच्या दिशेने जाणारे चालक प्रकाश परमेश्वर घुले (२५, रा. डोळेवाडी, राजुरी, ता. जामखेड, जि. अहमदनगर) व क्लिनर महेश बाबू तोडेकर (२१, रा. मेंगडेवाडी, ता. जि. बीड) हे कासार्डे जांभुळवाडीनजीकच्या रुक्मिणी मंगल कार्यालय येथील महामार्गावरील बॉक्सवेल ब्रिजवर पहाटे साडेपाचच्या दरम्यान आले आले.त्याचवेळी सांगलीवरून आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रकमध्ये कोंबडीचे खाद्य घेऊन कुडाळच्या दिशेने जाणारे चालक समीर गौस सय्यद (३९, रा. मिरज, बुधवारपेठ, जि. सांगली) हेही आले असता दोन्ही चालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्याने दोन्ही मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात घडला.या अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच कासार्डे दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार नितीन खाडे यांनी धाव घेत स्थानिक ग्रामस्थ व महामार्ग चौपदरीकरण करणारी केसीसी कंपनीचे कर्मचारी घेत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. तोपर्यंत गंभीर दुखापत नसल्याने किरकोळ दुखापत झालेल्या चालक व क्लिनर यांना जागेवरच रुग्णवाहिकाबोलावून प्राथमिक उपचार करण्यात आले.मात्र, तीन वाहने जातील असा मार्ग असताना नेमका अपघात कसा घडला याबाबत चर्चा केली जात असून दुसºया वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात अथवा एखादे वाहन थांबले असता बाजू देताना दोन्ही ट्रकचालकांचा वाहनांवरील ताबा सुटला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मात्र नेमका अपघात कसा घडला हे सांगणे कठीण आहे. या अपघातानंतर काहींनी चोरीचाही प्रयत्न केला. मात्र नागरिक व पोलीस नितीन खाडे हे घटनास्थळी दाखल होताच ते पसार झाले. या अपघाताची नोंद झाली नव्हती.यानंतर महामार्ग चौपदरीकरण करणाºया केसीसी कंपनीच्या हायड्रा या मशीन व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही वाहने तब्बल चार तासांनंतर बाजूला करीत वाहतूक मूळ मार्गावरून पूर्ववत करण्यात आली.दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसानया अपघाताची भीषणता एवढी होती की कुडाळच्या दिशेने जाणारा ट्रक अपघातानंतर दुसºया ट्रकच्या बाजूला म्हणजेच तळेरेच्या दिशेने तोंड करून उभा होता. अपघाताची भीषणता पाहता मोठी गंभीर दुखापत झाली असे दृश्य दिसत होते. मात्र, दोन वाहनांतील चालक व क्लिनर यांना किरकोळ डोक्याला, पायाला व मुका मार लागला होता. सांगलीवरून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची पुढील दोन्ही चाके तुटल्याने पुढील टायर वेगळे झाले होते. तर दोन्ही ट्रकचा समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग