शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण : आदिवासींनाही मिळाली हक्काची शिधापत्रिका

By admin | Updated: October 21, 2014 23:41 IST

सुवर्ण जयंती राजस्व अभियान समाधान योजनेअंतर्गत आकले ग्रामपंचायतीच्या आवारात १४० आदिवासींना शिधापत्रिका व फराळाचे वाटप

चिपळूण : ऐन दिवाळीच्या काळात आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या आदिम समाज बांधवांना आयुष्यात प्रकाश मिळावा, त्याला जगण्यासाठी आशेचा किरण निर्माण व्हावा यासाठी तहसीलदार वृषाली पाटील यांनी १४० आदिवासींना शिधापत्रिकांचे वाटप करुन दिवाळीची भेट दिली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून हा समाज लांब असल्याने शासनाच्या अनेक सोयीसुविधांचा लाभ त्यांना मिळत नाही. शिक्षणापासून ते कोसो दूर असतात. अज्ञानाच्या अंधकारात बुडालेल्या या समाजाला शासनाच्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. रेशनकार्ड, जातीचे दाखले यासारख्या योजना तसेच काही मुलभूत सुविधा देण्यास शासनाचे प्रतिनिधी म्हणून माझ्या कारकीर्दीत तुम्हाला रेशनकार्डसह उद्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या फराळाने तुमचे तोंड गोड करण्यातच माझा आनंद द्विगुणित होत आहे, असे तहसीलदार वृषाली पाटील यांनी सांगितले. आकले पंचक्रोशीतील आदिवासी समाजाला सुवर्ण जयंती राजस्व अभियान समाधान योजनेअंतर्गत आकले ग्रामपंचायतीच्या आवारात १४० आदिवासींना शिधापत्रिका व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, मंडल अधिकारी दिवाकर केळुस्कर, आकले तलाठी गणेश सुर्वे, तिवरे तलाठी डी. एम. नागरगोजे, कळकवणे तलाठी ए. एस.थोरात, पिंपळी खुर्द तलाठी शुभांगी गोंगाणे, पंचायत समिती सदस्य दीपक वारोसे, आकले सरपंच संतोष कदम, तिवरे सरपंच हरिश्चंद्र शिरकर, आकले पोलीस पाटील सुरेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिराम जगताप, आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत निकम, तालुका सचिव महेश जाधव, सामाजिक संघटक सचिन मोहिते उपस्थित होते. पुरवठा अधिकारी केतन आवले यांनी प्रास्ताविक केले. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे व तहसीलदार पाटील यांनी या कामासाठी गती दिल्याने आज हा दिवस उजाडला असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही आपल्याला हे काम वेगाने करावयाचे आहे असे ते म्हणाले. सचिन मोहिते, चंद्रकांत जाधव, शशिकांत निकम, काशिराम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे आदिवासी बांधवांना रेशनकार्ड देताना आनंद होत असल्याचेही आवले म्हणाले. सूत्रसंचालन चंद्रकांत जाधव यांनी केले. (प्रतिनिधी)रेशनकार्डसह दिवाळीच्या फराळाने आदिवासींचे तोंड गोड करण्यात आनंदच : पाटील.आकले परिसरातील १४० आदिवासांनी शिधापत्रिका आणि फराळाचे तहसिलदारांनी केले वाटप.चिपळूण तालुक्यातील आकले परिसरातील आदिवासी बांधवांना तहसिलदार वृषाली पाटील यांच्याहस्ते नुकतेच शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.