शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

केरळीयनांची खरेदीखते तपासा

By admin | Updated: August 24, 2015 23:21 IST

दत्ताराम गावकर : जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

कसई दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात केरळीयन लोकांनी बेकायदेशीर वनक्षेत्रात वास्तव्य वाढवले आहे. अनेकांनी हजारो हेक्टर क्षेत्रात जंगलतोड करून बोगस खरेदीखते, शेतकरी दाखले व महसूल अधिकारी यांच्या संगनमताने केलेली आहेत, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निवेदनाद्वारे या संपूर्ण व्यवहारांची गोपनीय चौकशी करावी व दोषींवर तत्काळ कारवाई करावी. अन्यथा संपूर्ण शासन प्रणाली विरोधात न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष श्रेया देसाई, महिला तालुकाध्यक्षा छाया परब, असंख्य मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रोळी मंदिर ते तहसीलदार कार्यालय असे पायी चालत अनेक घोेषणा देत दोडामार्ग बाजारपेठेतून हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर काढला. यावेळी पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवेदनातून तालुक्यातील के रळीयन परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत. या जमिनी शेतकऱ्यांबरोबर शासनाच्या जमिनीवरही या लोकांनी अतिक्रमण केले आहे. या केरळीयन लोकांकडून तालुक्यात मारामारी, खून आदी प्रकरणे होत असल्याने तालुक्याची बदनामी होत आहे. यावर पोलिसांनी आळा घालावा, या मागणीबरोबर वाढीव घरपट्टी, बोगस ओळखपत्रे, रेशनकार्ड, बेकायदेशीर फार्म हाऊस, रबर बोर्डाकडून फसवणूक करून केरळीयन लोकांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे. अवैध गौण खनिज सुरू आहे. अवैध धंदे सुरू आहेत, कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईचा निधी उपलब्ध असूनही वाटप केले नाही, वाढीव घरपट्टी रद्द करावी, तालुक्यात केलेले सर्व रस्त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे, केर भेकुर्ली पंतप्रधान ग्रामसडक योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला या सर्व मागण्यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली. तहसीलदार उपस्थित नसल्याने यावेळी उपस्थित असलेले नायब तहसीलदार पी. जी. केरकर यांनी हे निवेदन स्वीकारले. हे निवेदन आपण वरिष्ठांकडे पाठवू, असे आश्वासन केरकर यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. तालुक्यातील विविध प्रश्नांंसंदर्भात मनसेच्या दृष्टीने मोर्चा काढला. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत आईर हे न आल्याने त्यांच्या अनुपस्थितीबाबत यावेळी दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा कार्यकर्त्यात सुरू होती.