कासार्डे येथे झाडावर कार आदळून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 10:32 IST2019-04-23T10:31:03+5:302019-04-23T10:32:01+5:30
महामार्गावरील कासार्डे फणसगाव फाटा येथून दीड किलोमीटर अंतरावर झाडावर कार आदळून अपघात झाला. या अपघातात चालक नरेश सुरेश भोसले (२८, रा. यमगर्णी, बेळगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याला कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले.

कासार्डे येथे झाडावर कार आदळून एक ठार
कणकवली : महामार्गावरील कासार्डे फणसगाव फाटा येथून दीड किलोमीटर अंतरावर झाडावर कार आदळून अपघात झाला. या अपघातात चालक नरेश सुरेश भोसले (२८, रा. यमगर्णी, बेळगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याला कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले.
नरेश भोसले यांचा ट्रक फणसगाव येथे नादुरुस्त झाला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी भोसले आणि मेकॅनिकल सागर सर्जेराव लोहार (३०, रा. निपाणी, बेळगाव) बेळगाव येथून शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास फणसगाव येथे जाण्यासाठी निघाले होते. कार (एम. एच. १२, ई एक्स ८७९९) घेऊन सागर लोहार व चालक नरेश भोसले निघाले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास ते कासार्डे-फणसगाव फाट्याच्या दरम्यान पोहोचले. यावेळी अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे झाडावर कार आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात नरेश गंभीर जखमी झाला. तर सागर लोहार याला किरकोळ दुखापत झाली. जखमी अवस्थेतील नरेश याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.