शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बछड्याला मिळाली आईच्या मायेची उब !

By admin | Updated: August 24, 2014 00:50 IST

वन अधिकाऱ्यांचा प्रयोग यशस्वी

अयोध्याप्रसाद गावकर , पुरळ : माणूस असो की जनावर. आईची माया सारखीच असते याची प्रचिती शनिवारी वाडा येथे आली. काल विहिरातून मुक्त केलेल्या बछड्याला त्याच्या आईने म्हणजेच मादी बिबट्याने शोधून काढून सोबत नेले. काल, शुक्रवारी सकाळी वाडा येथील माई परब यांच्या माड बागायतीमधील विहिरीमध्ये सुमारे तीन महिन्यांचा बिबट्याचा बछडा पाण्यामध्ये घायाळ अवस्थेत आढळला होता. या बछड्याला वनअधिकारी व ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढले होते. यानंतर वन अधिकाऱ्यांनी या बछड्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार केले. बछडा लहान असल्याने त्याला भक्ष्य मिळविणे शक्य नसल्याने त्याला त्याच्या आईच्याच ताब्यात देणे महत्त्वाचे होते. वन अधिकाऱ्यांनी मिळालेल्या ठिकाणी बछड्याला एका छोट्या पिंजऱ्यामध्ये ठेवले. पिंजऱ्याच्या दरवाजाला दोरी बांधून तेथीलच जवळ असलेल्या पंपशेड इमारतीमध्ये ती दोरी हातात घेऊन वन अधिकारी दडून बसले होते. रात्री पावणेदोनच्या सुमारास बछडा पडलेल्या विहिरीजवळ बिबट्या मादी येऊन आपल्या बछड्यासाठी गुरगुरू लागली. हा आवाज ऐकून त्या बछड्याने आईला प्रतिसाद दिला आणि बछडा पिंजऱ्यामधून मुक्तता होण्यासाठी धडपडू लागला. ही गोष्ट वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने बछड्याला आईच्या ताब्यात देण्यासाठी त्यांनी पिंजऱ्याच्या दरवाजाची दोरी खेचून बछड्याची मुक्तता केली. बछडा आईसोबत निघून गेला. वन अधिकाऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी घडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.