शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

भाव खाव नुको

By admin | Updated: November 24, 2014 23:04 IST

मालवणी तडका

सकलो : भाव खाव नुको म्हनान तू कोनाका सांगतस?
तुकलो : महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन भावांका सांगतय. भाव खाव नुको म्हनान.
सकलो : म्हंजे भावाक खाव नुको असा तुका सांगाचा हा की काय?
तुकलो : येका अर्थी तसाच सांगाचा हा. पन तुका वाटतला ता ठाकरे बंधुंचा हा की काय?
सकलो : म्हंजे ठाकरे बंधूंचा न्हय?
तुकलो : मी आपला काल्पनिक पात्रा घेवन सांगतय. योक राज आसता आनी योक उध्दव आसता.
सकलो : म्हंजे धनुष्यवाले आनी इंजिनवाले.
तुकलो : तुका जा वाटता ता माझ्या मनात नाय. पन माझ्या जा मनात हा ता तुझ्या ध्यानात ठेव. म्हंजे महाराष्ट्राचा भला व्हयत.
सकलो : तू ज्योतिषासारकी भाषा बोलाक लागलस.
तुकलो : असा तुका वाटतला, पन तसा नाय आसा. राजला पन वाटलला माझ्या पाटसून सेना येयत म्हनान. तसा व्होवक नाय.
सकलो : उध्दवान बांध घातल्यान म्हनान सेना थांबान रवली. पन थोडी वाटनी झाली.
तुकलो : असा तुका वाटता मतांची वाटनी झाली म्हनान. पन ता राज मानूक तयार नाय.
सकलो : तो तेचो दोष. पन वाटनी झाली ह्या खरा हा.
तुकलो : ह्या तुझ्यासारक्या सामान्यांका वाटता वाटनी म्हंजेच विभागनी झाली. पन राज ह्यो असामान्य हा. तेका तसा वाटना नाय.
सकलो : म्हनान तर रामदास तेका म्हनता, माझी करता टिंगल म्हनान तेची निवडान येता सिंगल.
तुकलो : ते येकामेकाची खेचतत.
सकलो : बरोबर हा. म्हंजे तेंची डबलबारीच लावक व्हयी हा.
तुकलो : समोरासमूर इले तर ते काय शिल्लक ठेवचे नाय. दोघांनीव कमरेचा सोडून डोक्यावर बांधाची तयारी ठेवलली आसता, अशी तेंची भाषा आसता.
सकलो : राजकारनात विरंगुळो ह्यो व्हयोच आसता. नाटकात कॉमेडी पात्रा कशी आसतत, तसा हा.
तुकलो : ते दोघव भाव कधी येकत्र येवचे नाय. येवचा व्हता तर निवडनुकीच्या आदी येवक व्हया व्हता. असाव रामदासान पुडी सोडल्यान.
सकलो : तेका काय पुडी सोडूनच देवची आसता. येकदा पुडी सोडली की दुसऱ्या खयल्या भाषनात राज तकडे पुडी सोडता. आनी आपल्या तत्वज्ञानात आपला काम इसारता.
तुकलो : अगदी बरोबर. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपन कोरडे पाषान असा. अरे तुमी तुमचो इगो वायच बाजूक सारा आनी येवा मरे येकत्र.
सकलो : वायच खय घरात खट्ट झाला की दवाखान्यातनी भेटतत मगे आमच्यासारके निर्लज्ज तेेंका इचारतत, आता येतास मा येकत्र?
तुकलो : मगे पोटात हसत ही राजकीय भेट न्हय. वगीच तुमी तेचो येगळो अर्थ काढू नुको.
सकलो : मगे आमची चॅनलवर चर्चा सुरू. दोन भाव येकत्र येतत. तेच्या तज्ज्ञांची की पोपटपंचीवाल्यांची चर्चा रंगात येता.
तुकलो : तेच्यात आपनाक किती म्हायती ह्याच सांगला जाता.
सकलो : मगे भावांच्या प्रतिक्रिया. तेतूर राजकीय काय नाय. आमी ‘घरगुती’साठी येकत्र येतव.
तुकलो : अगदी बरोबर. तेचो तुमी नुको तो अर्थ काढू नुको, म्हनान वर तंबी.
सकलो : तुमका खराच जर महाराष्ट्राच्या जनतेचो जो तुमी सांगतास, तसो पुळको हा तर झाला गेला सगळा इसरा आनी मारा मिठी येकामेकाक.
तुकलो : पन पयली मिठी कोनी मारूची म्हनान जर तुमी इचारच करीत रवलास, तर सगळो येळ निघान गेललो आसतलो.
सकलो : आनी तुमची चेष्टा दाढी कुरवाळत रामदास करतलो. आनी तेना ती करूचीच. असाच तुमचा वागना आसता.
तुकलो : खरा हा. सायबांची प्रॉपर्टी सैनिक हा, ह्या पुऱ्या महाराष्ट्राक म्हायती हा. तेची वाटनी झाली, तर शिल्लक काय रवाचा नाय. ती वाढाक व्हयी, तर तुमी येकत्र येवा.
सकलो : कळता पन वळना नाय.
तुकलो : खरा हा. म्हनान सांगाचा वाटता, भाव खाव नुको आनी भावाकव खाव नको.
- विजय पालकर