शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

भोगवे समुद्र किनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’; केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 13:44 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र दिले आहे.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे  महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला. एकूण ४ उत्कृष्ट मानकांच्या ३३ घटकांआधारे ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट १३ समुद्र किनाऱ्याची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.

पर्यावरण शिक्षण आणि माहिती, आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी सोमवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  ही  माहिती दिली.३३ घटकांव्दारे निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढ-या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील  निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते. याच समुद्र किनाऱ्याची ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ ने एकूण ४ उत्कृष्ट मानकांच्या  ३३  घटकांआधारे ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी निवड केली.भोगवे किनाऱ्यावर जाणारा मार्ग

भोगवे समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी परूळे बाजार येथून ६ किलोमीटर प्रवास करून जाता येते. प्रस्तावित चिपी विमानतळपासून भोगवे किनारा हवाई अंतर एक ते दीड किलोमीटर आहे. केंद्र शासनाच्या निर्मला सागरी तट अभियानाअंतर्गत भोगवे किनाऱ्यावर बैठक व्यवस्था, स्वच्छता गृह, लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मालवण येथील देवबाग सागरी किनाऱ्याचा नस्त हा शेवटचा भाग जेथे संपतो तेथून भोगवे किनारा सुरू होतो. देवबाग येथून समुद्रातून जाण्यासाठी हा किनारा १0 मिनीटांच्या अंतरावर आहे.

निवती किल्ला ठरतोय आकर्षण

भोगवे समुद्र किनाऱ्यावर निवती किल्ला वसलेला आहे. निवती किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस भोगवेचा जवळपास चार किलोमीटर लांब स्वच्छ सागर किनारा पसरलेला आपल्याला दिसतो. या किनाºयावर पर्यटकांची मोठी वर्दळ अद्याप नाही. त्यामुळे येथे समुद्राच्या लाटांव्यतिरिक्त निरव शांतता पहायला मिळते. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचे या ठिकाणी आकर्षण पाहायला मिळत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणtourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग