शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा ‘तो’ निर्णय चुकीचा

By admin | Updated: November 11, 2014 23:21 IST

हिंदू जनजागृती समन्वय समितीकडून विरोध

सावंतवाडी : ‘भगवा दहशतवाद’ असे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपने जाण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे आम्ही याला विरोध करीत असल्याचे हिंदू जनजागृतीच्या समन्वय सदस्यांनी सांगितले.नगरपालिका पत्रकार कक्षात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हेमंत मणेरीकर, दिलीप आठलेकर, एकनाथ सावंत आदी उपस्थित होते. भाजप हा हिंदूंचा पक्ष आहे. शिवसेनेशी फारकत घेतली का? असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले होते. तेच आता भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे भाजप पक्षाच्या निर्णयाचा आम्ही विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जगात ख्रिश्चनांची १५७, तर मुस्लीमांची ५२ राष्ट्रे आहेत. मात्र, हिंदूचे एकही राष्ट्र नाही. भारत हा निधर्मी देश बनला आहे. या निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, तर बहुसंख्य हिंदूंवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे हिंदू धर्म जागृती होण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी भव्य वाहन फेरी काढण्याचे समितीने ठरविले आहे. फेरीचा प्रारंभ येथील आत्मेश्वर मंदिरापासून होणार असून शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन गवळी तिठा येथे या फेरीची सांगता होणार आहे. या फेरीत धर्माभिमानी हिंदूनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन येथील कळसूलकर हायस्कूलच्या पटांगणावर करण्यात आले आहे. या सभेत हिंदूत्वनिष्ठांचे मार्गदर्शन, साधना, राष्ट्र अन् धर्म याविषयीचे ग्रंथप्रदर्शन, हिंदू राष्ट्रस्थापना, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, धर्मशिक्षण आदी विषयांवरही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू जनजागृतीच्या सदस्यांनी दिली. (वार्ताहर)