शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बीच शॅकमुळे रोजगाराचे नवे दालन खुले होणार : हरी खोबरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:45 IST

कोकण किनारपट्टीवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक धोरणास मंजुरी देताना ८ ठिकाणी पायलट प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मालवण किनारपट्टीवरील तारकर्लीचा समावेश आहे.

ठळक मुद्देहरी खोबरेकर यांनी व्यक्त केला विश्वास कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे नेहमीच झुकते माप

मालवण : सागरी पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या तारकर्लीसह कोकण किनारपट्टीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

कोकण किनारपट्टीवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक धोरणास मंजुरी देताना ८ ठिकाणी पायलट प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मालवण किनारपट्टीवरील तारकर्लीचा समावेश आहे. ही बाब आमच्यासाठी आनंदाची व अभिमानाची असून पर्यटन वाढीबरोबर रोजगाराचे नवे दालन खुली करणारी आहे, असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख तथा तारकर्ली जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने येथील पर्यटन विकासासाठी ज्या मागण्या आम्ही आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पोहोचविल्या त्यात बीच शॅक ही मागणीही प्रामुख्याने होती. या मागणीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त करीत असल्याचे खोबरेकर यांनी स्पष्ट केले.कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झुकते माप नेहमीच राहिले आहे. कोकणवर असलेले विशेष प्रेम पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही आपल्या कामातून दाखवून देत आहेत. मच्छिमारांसह शेतकरीवर्गाला फायदेशीर ठरणारी चांदा ते बांदा योजना माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून यापूर्वी राबविण्यात आली. यापुढे नव्या योजनेतून शेतकरी, मच्छिमार यांच्यासह पर्यटन व्यावसायिक व अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असेही खोबरेकर म्हणाले.स्थानिकांना रोजगाराचे नवे दालनबीचवर शॅक धोरणास मंजुरी मिळावी यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार आपण पर्यटन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असल्याचे खोबरेकर यांनी स्पष्ट केले. बीच शॅक धोरणास मान्यता मिळाल्यामुळे भविष्यात देशी-विदेशी पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणांतर्गत राज्यातील ८ समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत.

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा