शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

सहा यंत्रांवर आधारचा भार

By admin | Updated: July 6, 2015 00:24 IST

राजापूर तालुका : ७० टक्के जनता आधारपासून वंचित

राजापूर : प्रशासनाचा ढीम्मपणा, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदाराची उदासिनता यामुळे राजापूर तालुक्यातील सुमारे ७० टक्के जनता म्हणजेच १ लाख १४ हजार १ जनता आधार कार्डपासून वंचित राहिली आहे. सध्या प्रशासकीय पातळीवर रेशनिंंगकार्ड आधार कार्डाशी संलग्न करण्याची मोहीम सुरु असली तरी या मोहिमेमध्ये आधारकार्डमुळेच अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे राजापूर तालुक्यासाठी एकूण सहा आधार कार्ड मशिन देण्यात आल्या असल्या तरी त्या बंद स्थितीत असल्याने लोकांना आता आधार मिळणेच कठीण बनले आहे.गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडून बँक खाते, गॅस कार्ड, निवडणूक ओळखपत्र व आता रेशनिंंग कार्ड आधारकार्डशी संलग्न करण्याचा धडाका सुरु करण्यात आला आहे. आधारकार्ड नसल्यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. निवडणूक ओळखपत्राप्रमाणे आधारकार्ड काढून देण्याची व्यवस्था शासकीय पातळीवरुन करण्यात आली. मात्र, ठेकेदाराचा गलथानपणा, प्रशासनाचा ढीम्मपणा व लोकप्रतिनिधीची उदासीनता यामुळे आजही तालुक्यातील बहुतांश जनता आधार कार्डापासून वंचित आहे. आता शासनाच्या आदेशानुसार रेशन कार्डशी आधारकार्ड संलग्न करण्यासाठी आधारकार्डाची नितांत आवश्यकता आहे. राजापूर तालुक्यात एकही आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरु नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेला आर्र्थिक भुर्दंड सोसून रत्नागिरी किंंवा लांजा या ठिकाणी रांगा लावाव्या लागत आहेत. राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आधारचा बोजवारा उडाला असून शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच आधार यंत्रणेत बिघाड झाल्याने व केवळ सहा मशिन्सवर हे काम सुरू असल्याने त्याबाबत आता कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. ही यंत्रणा लवकर पूर्ववत व्हावी अशी मागणी आहे.(प्रतिनिधी)मशिनची अनुपलब्धतासहा वर्षांपासून पुढे सर्वच मुलांसह सर्वांचेच आधारकार्ड काढण्याचे आदेश शासन स्तरावरुन देण्यात आले असले तरी राजापूर तालुक्यात लहान मुलांचे आधारकार्ड नोंदणी मशिन उपलब्ध नसल्यामुळे अनेक लहानग्यांनाही आधार कार्डापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शासकीय स्तरावरुन खास लहान मुलांसाठी स्वतंत्र आधार कार्ड नोंदणी कॅम्प घेण्याची मागणी संपूर्ण तालुकाभरातून करण्यात येत आहे.आधारकार्डचे वाटप महत्त्वाचे राजापूर तालुक्यातील २३७ महसुली गावांची एकूण लोकसंख्या एक लाख ६५ हजार ८७५ एवढी आहे. यापैकी ३० जूनअखेर केवळ ६४ हजार ४७४ लोकांची आधारकार्ड नोदणी झालेली आहे. अद्यापही तालुक्यातील १ लाख १४ हजार १ लोकांना आधार कार्ड मिळालेली नाहीत व आता त्यांनी नोदणी करावी, असे एकही आधारकार्ड नोंदणी केंद्र संपूर्ण तालुकाभरात सुरु नाही.राजापूर तालुक्यात लवकरात लवकर आधार कार्ड मिळण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा परिषद विभागात आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरु करावे, अशी मागणी तालुक्यातील आमजनतेतून करण्यात येत आहे. मात्र, याबाबत प्रशासन ढिम्म असून, लोकप्रतिनिधींना याबाबत काहीही देणे-घेणे नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी सध्या राजापुरात आधार कार्ड नोंदणी प्र्िरकयेचा बोजवारा उडाला आहे.