sindhudurg: रुग्णाकडून डॉक्टरवर हल्ल्याचा प्रयत्न, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:59 IST2026-03-16T13:57:25+5:302026-03-16T13:59:37+5:30

याघटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली

Attempted attack on doctor by patient who came for treatment at Kankavli Upazila Hospital | sindhudurg: रुग्णाकडून डॉक्टरवर हल्ल्याचा प्रयत्न, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील घटना

sindhudurg: रुग्णाकडून डॉक्टरवर हल्ल्याचा प्रयत्न, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील घटना

कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाने डॉक्टरवर शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याघटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तत्काळ कणकवलीपोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकाश शिंदे (वय ५०) यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना काल, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 

याबाबत माहिती अशी की, बांधकरवाडी येथील प्रकाश श्यामराव शिंदे हे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले होते. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. मात्र, शिंदे हे मद्यपान केलेल्या अवस्थेत होते. त्यांनी डॉक्टरांना मला सलाईन लावायचे आहे असे सांगितले. डॉक्टरांनी सलाईनची आवश्यकता नसल्याचे सांगितले. 

दरम्यान, शिंदे यांनी गेट बाहेर लावलेल्या आपल्या रिक्षातून धारदार कुकरीसारखा सुरा आणला व डॉक्टरांना धमकावले. रुग्णालयात धुमाकूळ घालून वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास चोरमोले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मध्यस्ती करणाऱ्या त्यांच्या मुलाला देखील मारण्याची धमकी दिली. रुग्णालयाचे  सुरक्षा रक्षक अमित परब, पांडुरंग सुतार, सुनील यादव यांनी धाव घेत त्यांना हल्ला करण्यापासून रोखले. तसेच घटनेची माहिती तत्काळ कणकवली पोलिसांना दिली. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकाश शिंदे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज पाटील, डॉ.विकास चोरमोले, कक्षसेवक सुनील यादव यांनी कणकवली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. याबाबतची पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Attempted attack on doctor by patient who came for treatment at Kankavli Upazila Hospital