शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत उद्या पुरातत्व कार्यशाळा

By admin | Updated: July 4, 2015 00:14 IST

विद्यापीठाच्या सेंटर फॉर आर्किआॅलॉजीच्यावतीने आयोजन

सिंधुदुर्गनगरी : मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर आर्किआॅलॉजीच्यावतीने रविवारी ( दि. ५) होणाऱ्या दुसऱ्या वार्षिक पुरातत्व शोध मोहीम कार्यशाळेत पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी व हिवाळे येथील कातळ शिल्पांबाबत शोध निबंध आणि सादरीकरण करणार आहेत. यामुळे सिंधुदुर्गातील कातळ शिल्पांना पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे.सध्या नाशिक येथे विभागीय माहिती उपसंचालक असलेले सतीश लळीत पुरातत्व शास्त्राचे अभ्यासक असून, ‘रॉक आर्ट सोसायटी आॅफ इंडिया’चे आजीव सदस्य आहेत. सिंधुदुर्गातील हिवाळे, विर्डी, कुडोपी येथील कातळ शिल्पांचा त्यांनी अभ्यास केला असून, याबाबतचा शोध निबंध त्यांनी २०१२ मध्ये सोसायटीच्या १२ व्या वार्षिक परिषदेत बदामी (कर्नाटक) येथे सादर केला होता.सध्या ते मुंबई विद्यापीठामध्ये सेंटर फॉर आर्किआॅलॉजीमध्ये पुरातत्व शास्त्राचा अभ्यासक्रम करीत आहेत. या सेंटरतर्फे मुंबई विद्यापीठातील नॅनोटेक्नॉलॉजी बिल्डिं गमध्ये दुसरी वार्षिक पुरातत्व शोध मोहीम कार्यशाळा रविवारी होत आहे. या कार्यशाळेत अनेक संशोधक व अभ्यासक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेमध्ये लळीत आपला शोधनिबंध सादर करतील व छायाचित्रांसह सादरीकरण करतील. दक्षिण गोव्यातील पणसाईमळ येथे अशीच कातळ शिल्पे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही उपळे, मेर्वी, निवळी येथे अशीच कातळ शिल्पे आढळली आहेत. त्यांच्या अभ्यासातून कोकणच्या प्रागैतिहासिक काळावर प्रकाश पडणार आहे. या कार्यशाळेचे आयोजन सेंटर फॉर आर्किआॅलॉजीचे प्रमुख आणि ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. कुरुष दलाल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)सतीश लळीत यांचे मार्गदर्शन पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी व हिवाळे येथील कातळ शिल्पांबाबत शोध निबंध आणि सादरीकरण करणार आहेत.